Home > Latest news > जिल्ह्यात सोमवारी 529 कोरोनामुक्त, 58 बाधित तर 1 मृत्यु ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या 2627

जिल्ह्यात सोमवारी 529 कोरोनामुक्त, 58 बाधित तर 1 मृत्यु ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या 2627

In the district on Monday, 529 corona free, 58 infected and 1 death active patients number 2627

जिल्ह्यात सोमवारी 529 कोरोनामुक्त, 58 बाधित तर 1 मृत्यु ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या 2627
X
चंद्रपूर, दि. 31 जानेवारी : गत चार-पाच दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट दिसून येत असून कोरोनामुक्त होणा-यांची संख्या वाढत आहे. 24 तासात जिल्ह्यात 529 जणांनी कोरोनावर मात केली असून त्या रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 58 नवीन रुग्ण बाधीत झाले आहे. तर सोमवारी जिल्ह्यात एका बाधिताचा मृत्यू झाला आहे.

आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात 34, चंद्रपूर 9, बल्लारपूर 2, भद्रावती 2, ब्रह्मपुरी 2, मुल 2, राजुरा 3, वरोरा 2, कोरपना येथे 2 रुग्ण आढळून आले असून नागभीड, सिंदेवाही, सावली, पोंभूर्णा, गोंडपिपरी, चिमूर, जिवती व इतर ठिकाणी बाधित रुग्णांची संख्या शून्य आहे. आज मृत झालेल्यामध्ये मुल येथील एका पुरुषाचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 97 हजार 469 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 93 हजार 291 झाली आहे. सध्या 2627 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 8 लाख 44 हजार 250 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 7 लाख 45 हजार 355 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1551बाधितांचे मृत्यू झाले आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

Updated : 31 Jan 2022 3:51 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top