चंद्रपूर शहरातील जलनगर, सराई वार्ड येथील घाणीचे साम्राज्य तात्काळ हटवा _युवा स्वभिमान पक्ष चंद्रपुर यांचे म न पा आयुक्तांना निवेदन_
Immediately remove the kingdom of filth from Jalnagar, Sarai ward in Chandrapur city Statement of Yuva Swabhiman Paksh Chandrapur to Municipal Commissioner
X
:- सविस्तर वृत्त असे की सध्या देशात कोरोना सारख्या भीषण संकटातून देश पूर्णपणे मुक्त झाला नसून परत मायक्रोमायसिस, डेल्टा, ओमायिक्रोन सारख्या नवीन रोगाची दहशत सर्वीकडे असल्याने नागरिकांचे आरोग्य तर धोक्यात आहेच आणि त्यात चंद्रपूर शहरातील
सपना टॉकीज च्या बाजूला जलनगर, सराई वार्ड, वार्ड नंबर- ५१ येथे घाणीचे साम्राज्य खूप जास्त प्रमाणात वाढलेले आहे. तथा गेल्या काही महिन्यांपासून नाल्यांची सफाई नियमितपणे केली जात नसल्यामुळे तेथील सांडपाणी रस्त्यावर जमा होत असतं ज्यामुळे दुर्गंधी व मच्छरांचे प्रमाण खूप जास्त वाढले आहे. मच्छर मारण्याकरिता फवारणी होत नसल्यामुळे सद्यस्थितीत या भागातील नागरिक डेंग्यू सारख्या आजारास बळी पडत आहेत. येथील नागरिकांनी वार्ड मेंबर यांना याबाबत वारंवार तक्रार देऊन सुद्धा जाणीवपूर्वक सदर समस्येकडे दुर्लक्ष केल्या जात असल्याची तक्रार तेथील नागरिकांनी युवा स्वभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री. सुरज ठाकरे यांना सांगताच तात्काळ या समस्यांचे निवारण करण्याकरिता जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वात दिनांक:- १०/०२/२०२२ ला आयुक्त चंद्रपूर शहर महानगरपालिका यांना श्री. राहुल चव्हाण, सुरज काकडे, सुनील चव्हाण, संदेश दुर्योधन, प्रतीक गोडे, स्वप्नील दाते, अभिषेक सहारे, व सहकारी युवक व महिला आदी पदाधिकारी उपस्थित होते.