Home > Latest news > कृषी पंपाची वीज तोडणी न थांबविल्यास राष्ट्रवादी काँग्रेस तीव्र आंदोलन छेडणार

कृषी पंपाची वीज तोडणी न थांबविल्यास राष्ट्रवादी काँग्रेस तीव्र आंदोलन छेडणार

If the power cut of agricultural pumps is not stopped, NCP will start intense agitation

कृषी पंपाची वीज तोडणी न थांबविल्यास राष्ट्रवादी काँग्रेस तीव्र आंदोलन छेडणार
X

मरेगाव

वातावरणातील बदलामुळे पावसाचे दिवस वाढीस लागले आहेत. गेल्या खरीप हंगामातदेखील सोयाबीन, कपाशी, तूर या पिकांचे संततधार पावसामुळे नुकसान झाले. कीडरोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने उत्पादकतादेखील घटली. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. आता वीज वितरण कंपनीने वीजपुरवठा खंडित करून शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखीनच भर टाकली आहे. गहू, हरभरा, ज्वारी, मका, भाजीपाला आदी पिके पाण्याअभावी वाळत आहेत. ही पिकेही आता शेतकऱ्यांच्या हातून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे वीजपुरवठा खंडित करू नये. खंडित केलेला वीजपुरवठा सुरळीत करावा, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे मारेगाव तालुकाध्यक्ष भारत मत्ते, नगरसेवक हेमंत नरांजे, शेख अब्दुल शेख चॉंद, दयाल रोगे, जिजा वरारकर, नागेश रायपुरे, नितीन वाढई, सुरेश महाकुलकर, विवेक मस्की, अतुल पचारे यांनी दिला आहे.

Updated : 28 Jan 2022 5:52 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top