Home > Latest news > सौ. संगिता श्रीमाल यांनी केली 47 दिवसाची उपधान तपची तप आराधना

सौ. संगिता श्रीमाल यांनी केली 47 दिवसाची उपधान तपची तप आराधना

Hundred Sangita Shrimal performed 47 days of Upadhan Tapchi Tap Aradhana

सौ. संगिता श्रीमाल यांनी केली 47 दिवसाची उपधान तपची तप आराधना
X

यवतमाळ ः येथील भारतीय जैन संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष व समर्पण परिवाराचे जेष्ठ सदस्य प्रमोद श्रीमाल यांच्या पत्नी सौ. संगिता श्रीमाल यांनी आंतरिक्ष पार्श्‍वनाथ तिर्थ शिरपूर येथे आचार्य श्री. हंसकीर्ति सुरिश्‍वरजी म. सा. एवंम आचार्य भव्यकीर्ति सुरिजी म. सा. यांच्या सानिध्यामध्ये 47 दिवसाची उपधान तप आराधना पुर्ण केल्यानंतर त्यांचे यवतमाळ नगरित 47 दिवसानंतर तप आराधना करुन आगमना प्रसंर्गी श्रीमद् राजचंद्र ज्ञान मंदिर राजेंद्र नगर यवतमाळ येथून ढोल ताश्याच्या गजरात, धार्मिक गीत, कलशधारी महिला, गरबा नृत्य करत वरघोडा काढून तपस्वी सौ. संगिता श्रीमाल यांचे धार्मिक परंपराप्रमाणे स्वागत करण्यात आले व त्यांच्या निवासस्थानी हा वरघोडा पोहोचल्यानंतर भक्ती गितांचा कार्यक्रम करण्यात आला. या प्रसंगी जैन संगित महिला मंडळ, समर्पण परिवार, भारतीय जैन संघटनेचे सदस्य, श्रीमद् राजचंद्र ज्ञान मंदिरचे ट्रस्टी गण अच्छलगच्छ श्रीसंघ महिला मंडळचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी केशरिया भवन, अच्छलगच्छ भवन येथील देवालयाचे दर्शन करुन आराधना भवन येथील जैन साध्वींचे दर्शन करुन कार्यक्रमाची सांगता झाली.





Updated : 22 Feb 2022 6:16 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top