Home > Latest news > छत्रपती शिवाजी महाराज जयंतीदिनी सभामंडपाचे लोकार्पण झाल्याचा आनंद. - संजय कंचर्लावार

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीदिनी सभामंडपाचे लोकार्पण झाल्याचा आनंद. - संजय कंचर्लावार

Happiness of dedicating the auditorium on the birth anniversary of Chhatrapati Shivaji Maharaj. - Sanjay Kancharlawar


संजय कंचर्लावार यांचे नगरसेवक विकास निधी अंतर्गत बांधण्यात आलेल्या सभामंडपाचे लोकार्पण संपन्न.

चंद्रपूर ( )

संजय कंचर्लावार यांचे नगरसेवक विकास निधी अंतर्गत भानापेठ प्रभागातील युवक गणेश मंडळाच्या सभा मंडपाचे लोकार्पण नगरसेवक संजय कंचर्लावार यांचे हस्ते पार पडले. सुमारे ६६ वर्षांपासून युवक गणेश मंडळ याच ठिकाणी गणेश मूर्तीची स्थापना करते आहे. मंडळातील पदाधिकाऱ्यांची व परिसरातील नागरिकांची मागणी होती कि येते सभा मंडप व्हावे, परिसरातील नागरिकांची मागणी पूर्ण झाल्याचा व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीदिनी सभामंडपाचे लोकार्पण झाल्याचा आनंद असल्याचे यावेळी बोलताना संजय कंचर्लावार म्हणाले.

तत्पूर्वी छत्रपती शिवाजी महाराज जयंती चे आयोजन मंडल मार्फत करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज याचे प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तत्पश्चात महाप्रसादाचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते.

यावेळी चंद्रपूर शहर काँग्रेस अध्यक्ष रामू तिवारी, सदर कार्यक्रमात माजी नगरसेवक दीपक गवालपंछि, संतोष बांगडे, श्रीराम वासेकर, नरेंद्र बोबडे, सुभाष बनकर, संजय गवालपंछि, दिलीप चंदेल, विशाल गवालपंछि, सुधीर माजरे, करण गवालपंछि, अनिता बोबडे, राहुल नामपल्लीवर, योगेश्वर पचारे, जयसिंग गहरवार, अनुप वेगिनवार, अजय बच्चूवार, अजय चांदेकर, किशोर चहारे, वरून गवालपंछि, गणेश दर्शनवार, यश बांगडे, राजकुमार पाचभाई, केतन जोरगेवार, अशोक पटकोटवार, अक्षय घुबडे, शुभम डोंगरे, अक्षय पराते, शुभम कोडपे, राहुल चहारे, आनंद आगलावे, रितीक आगलावे, राहुल पाचभाई, सोनू बैग, नयन वैद्य, प्रथम चंदेल व इतर वार्डवासी उपस्थित होते.

Updated : 20 Feb 2022 8:40 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top