Home > Latest news > हनुमान मुर्तीच्‍या तोडफोडप्रकरणी पालकमंत्र्यांचे पोलिस अधिक्षकांना चौकशीचे निर्देश विसापूर येथील घटना

हनुमान मुर्तीच्‍या तोडफोडप्रकरणी पालकमंत्र्यांचे पोलिस अधिक्षकांना चौकशीचे निर्देश विसापूर येथील घटना

Hanuman idol vandalism case Guardian Minister directs Superintendent of Police to investigate Incident at Visapur
चंद्रपूर, दि. 24 : बल्‍लारपूर तालुक्‍यातील विसापूर गावानजिक भिवकुंड नाल्‍याजवळ श्री हनुमान मुर्तीची काही समाज कंटकांनी तोडफोड केल्‍याप्रकरणी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पोलिस अधिक्षकांना सदर प्रकरणाची चौकशी करत दोषींवर कडक कारवाई करण्‍याचे निर्देश दिले आहेत.
विसापूर गावानजिक भिवकुंड नाल्‍याजवळ काही समाजकंटकांनी श्री हनुमान मुर्तीची विटंबना व तोडफोड केल्‍यामुळे विसापूर येथील गावामध्‍ये असंतोष निर्माण झाला. धार्मिक भावना दुखावल्‍याने नागरिक संतप्‍त झाले आहे. परिस्थिती चिघळू नये यादृष्‍टीने पोलिस प्रशासनाने तातडीने हस्‍तक्षेप करून परिस्थिती आटोक्‍यात आणावी व चौकशीअंती दोषींवर कडक कारवाई करावी, असे निर्देश पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी पोलिस अधिक्षकांना दिले आहे.

Updated : 24 Nov 2022 2:10 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top