देशाला आत्मनिर्भरतेसाठी दिर्घकाळ प्रभावी ठरणारा अर्थसंकल्प - हंसराज अहीर
Hansraj Ahir: Long term budget for self reliance of the country
X
चंद्रपूर - प्रधानमंत्री माननिय नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वातील सरकारने सादर केलेला केंद्रीय अर्थसंकल्प सर्वसमावेशक असून देशाच्या भौगोलिक स्थितीशी सुसंगत ठरणारा आहे. भारताला जागतिक स्तरावर निर्यातक देश बनविण्याच्या प्रयत्न या अर्थसंकल्पातून केलेला आहे. या अर्थसंकल्पामुळे देशाची आत्मनिर्भरतेच्या दिशेने दिर्घकाळ वाटचाल होणार असून आर्थिक विकासाच्या बाबतीत सुध्दा देश स्वयंपूर्ण बनेल असे पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्राी हंसराज अहीर यांनी म्हटले आहे.
केंद्रीय अर्थसंकल्पावर प्रतिक्रीया व्यक्त करतांना हंसराज अहीर यांनी कृषी क्षेत्रा, उद्योग व स्वयंरोजगारवृध्दी तसेच अन्य पायाभूत सुविधांच्या विकासाकरीता अर्थसंकल्पाव्दारा केलेली आर्थीक तरतुद ही देशाला आत्मनिर्भरतेकडे नेणारी असून या अर्थसंकल्पात प्रत्येक क्षेत्राच्या विकासाला दृष्टीपथात ठेवून त्यासाठी नियोजनबध्दरित्या वित्तीय तरतूद करीत केंद्रीय अर्थमंत्रयांनी शेतकरी, महिला, युवा वर्ग, श्रमीक, कौशल्य कारागिर, कष्टकरी तसेच समाजातील प्रत्येक घटकांचा उत्कर्ष साधण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पातून केलेला आहे. कोरोना संकटकाळातून देशाला प्रगतीच्या दिशेने नेणारा तसेच सर्वांच्या आर्थिक उन्नतीला हातभार लावणारा हा कल्याणकारी अर्थसंकल्प असल्याचे सुध्दा म्हटले आहे.