Home > Latest news > बाभुळगावात ५० लाखांचा गुटखा जप्त

बाभुळगावात ५० लाखांचा गुटखा जप्त

गुटखा किंगचे नेटवर्क एलसीबीने तोडले

बाभुळगावात ५० लाखांचा गुटखा जप्त
X

यवतमाळ/बाभुळगाव शहरात किराणा दुकानाच्या आडून गुटख्याचे आंतरराज्यीय नेटवर्क चालविले जात होते. सुरुवातीला स्थानिक गुन्हे शाखा पथकानेही गुटखा कारवाई करायची म्हणून पाळत ठेवून गुरुवारी दुपारी धाड टाकली. मात्र, कारवाई दरम्यान या गुटखा विक्रीचे नेटवर्क किती मोठे आहे, याचा आवाका आला. ते पाहून कारवाई करणारे पोलिसही चक्रावले. एका गोदामातून तब्बल ५० लाखांपेक्षा अधिक किमतीचा प्रतिबंधित गुटखा हाती लागला.

अयफाज मेनन (३०) रा. बाभुळगाव असे संशयित आरोपीचे नाव आहे. त्याने लॉकडाऊननंतर गुटखाविक्री सुरू केली. अल्पावधीतच त्याचा हा व्यवसाय कोट्यावधीचा घरात पोहोचला महिन्याला दीड कोटीची उलाढाल यातून होऊ लागली. गुटखा आणण्यासाठी, वितरित करण्यासाठी वाहनांचा ताफा त्याने जमविला. हे सर्व नेटवर्क एलसीबीचे प्रमुख प्रदीप परदेशी, सहायक निरीक्षक विवेक घरात अजय डोळे, विनोद राठोड, नीलेश राठोड, महेश नाईक, रजनिकांत मडावी, निखील मडसे यांनी उद्ध्वस्त केले. यातील इतरही आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

मध्य प्रदेशच्या इंदोरमधून गुटख्याची आयात

बाभुळगावसारख्या लहानशा शहरात महिन्याला दीड कोटी • रुपयांच्या गुटख्यांची उलाढाल होत होती. थेट मध्य प्रदेशातील इंदोर येथून गुटखा आयात केला जात होता. हा गुटखा जिल्ह्यातील ग्रामीण भागात वितरित करण्याचे नेटवर्क आरोपीने उभे केले होते. यातून अल्पावधीतच त्याने शेकडो कोटींची माया जमविली आहे. पहिल्यांदा पोलिसांनी त्याच्या गोदामावर धाड टाकली आहे.

Updated : 25 Nov 2022 7:50 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top