Home > Latest news > पालकमंत्री वडेट्टीवार यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा

पालकमंत्री वडेट्टीवार यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा

Guardian Minister Vadettiwar's visit to Chandrapur district

पालकमंत्री वडेट्टीवार यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा
X

चंद्रपूर, दि. 18 फेब्रुवारी : राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, खार जमीन विकास, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार हे दि. 19 ते 21 फेब्रुवारी रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौ-यावर आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.

शनिवार, दि. 19 फेब्रुवारी : सकाळी 10.20 वा. शासकीय विश्रामगृह ब्रम्हपूरी येथे आगमन, सकाळी 10.30 वा. शासकीय विश्रामगृह येथे पट्टे व आर्थिक अनुदान वाटपाच्या कार्यक्रमास उपस्थिती, सकाळी 10.45 वा. विश्रामगृह येथे तालुकास्तरीय विकास कामांची आढावा बैठक, दुपारी 12.30 वा. सिव्हील लाईन ब्रम्हपुरी येथे सा.बा. विभागाच्या निवासी इमारत बांधकामाच्या भुमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती, दुपारी 1 ते 1.30 शासकीय विश्रामगृह येथे राखीव. दुपारी 2 वा. उदापूर – सावलगाव येथे रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरणाच्या भुमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती, दुपारी 3 वा. मालडोंगरी येथे उंच पुलाच्या बांधकामाच्या भुमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती, दुपारी 3.45 वा. चौगान येथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण कार्यक्रमास उपस्थिती, सायं. 5 वा. पारडगाव, सायं. 5.30 वा. बोढेगाव, सायं. 6 वा.रणमोचन येथे रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरणाच्या भुमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती, रात्री 8 वा. शासकीय विश्रामगृह ब्रम्हपूरी येथे आगमन व राखीव.

रविवार, दि. 20 फेब्रुवारी : सकाळी 10.15 वा. शासकीय विश्रामगृह सिंदेवाही येथे आगमन, सकाळी 10.30 वा. सा.बा. विभागाच्या निवासी इमारत बांधकामाच्या भुमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती, सकाळी 11 वा. पंचायत समिती सभागृह येथे तालुकास्तरीय विकास कामांची आढावा बैठक, दुपारी 12.30 ते 1 शासकीय विश्रामगृह येथे राखीव. दुपारी 1 वा. पळसगाव (जाट) येथे बौध्द विहाराच्या संरक्षण भिंत व सौंदर्यीकरणाच्या कामास उपस्थिती, दुपारी 2 वा. चिखल मिनघरी येथे सामाजिक सभागृहाच्या बांधकामाचे भुमिपूजन, दुपारी 3 वा. उमरवाही येथे आदिवासी मोहल्ल्यात समाज मंदिराच्या बांधकामाचे भुमिपूजन, सायं. 4 वा. रत्नापूर येथे वाचनालयाच्या बांधकामाचे भूमिपूजन, सायं. 5 वा. पेंढरी येथे सामाजिक सभागृहाच्या बांधकामाचे भूमिपूजन, सायं. 6 वाजता पेंढरी येथून गडचिरोली कडे प्रयाण.

सोमवार, दि. 21 फेब्रुवारी : सकाळी 11 वा. चिचबोडी (ता. सावली) येथे तांडावस्ती मधील विकासकामांचे तसेच रस्त्याच्या बांधकामाचे भुमिपूजन, सकाळी 11.30 वा. राजोली फाल येथे रस्ता व नालीच्या बांधकामाचे भुमिपूजन, सकाळी 11.45 वा. राजोली चक येथे रस्ता व नालीच्या बांधकामाचे भुमिपूजन, दुपारी 12.15 वा. मोखाळा येथे पक्षाच्या प्रशिक्षण शिबिरास उपस्थिती, दुपारी 2 वा. सिंचन विभागाचे विश्रामगृह येथे राखीव. दुपारी 2.40 वा. पंचायत समिती सावली येथे महाआवास अभियानअंतर्गत तालुकास्तरीय कार्यशाळेस उपस्थिती, सायं. 4 वा. सावली येथे सा.बा.उपविभाग नवीन प्रशासकीय इमारत बांधकाम तसेच निवासी इमारत बांधकामाचे भुमिपूजन, सायं. 5.30 वाजता नागपूर कडे प्रयाण.

Updated : 18 Feb 2022 1:33 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top