Home > Latest news > राष्ट्रपिता महात्मा गांधी पुण्यतिथी तथा हुतात्मा दिनानिमित्त अभिवादन

राष्ट्रपिता महात्मा गांधी पुण्यतिथी तथा हुतात्मा दिनानिमित्त अभिवादन

Greetings on the occasion of Father of the Nation Mahatma Gandhi Punyatithi and Martyrs' Day





चंद्रपूर | शहर महानगरपालिकेच्या वतीने महापौर राखी संजय कंचर्लावार यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त रविवार, दिनांक ३० जानेवारी रोजी आदरांजली वाहण्यात आली. देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांना आज हुतात्मा दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.




गांधी चौक येथील महानगरपालिका कार्यालय परिसर व जटपुरा गेटसमोरील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला महापौर राखी संजय कंचर्लावार यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. तसेच हुतात्मा दिनानिमित्त सिव्हिल लाईन येथील हुतात्मा स्मारक येथेही पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहण्यात आली. शिवाय प्रियदर्शिनी इंदिरा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पचक्र वाहण्यात आले. यावेळी सभागृहनेता देवानंद वाढई, सहाय्यक आयुक्त विद्या पाटील यांच्यासह कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

Updated : 30 Jan 2022 3:19 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top