स्वप्नांना कष्ठाचे बळ द्या. - माजी नगरसेवक संजय कंचर्लावार भानापेठ प्रभाग क्र. ११ येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव तसेच शालेय विद्यार्थ्यांना नोटबुक वाटप सोहळा संपन्न.
Give strength to dreams. - Former corporator Sanjay Kancharlawar Bhanapeth ward no. Commendation of meritorious students and distribution of notebooks to school children.


चंद्रपूर ( )
भानापेठ प्रभाग क्र. ११ येथे माजी नगरसेवक संजय कंचर्लावार यांच्या संकल्पनेतून भानापेठ येथील कोलबा स्वामी वाचनालय येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव तसेच शालेय विद्यार्थ्यांना नोटबुक वाटप सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंचावर श्री धार्मिक सर, श्री मधू कुंभारे, श्री दिवाकर झोडे, श्री पंकज शर्मा, श्री केतन मेहता, श्री सागर हांडे, श्री दिलीप चिमुरकर, निलेश बेडेकर, श्री नरेश ठाकरे, श्री किशोर गुजराथी आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
गतवर्षीच्या तुलनेत या शैक्षणिक वर्षीत भानापेठ प्रभागात गुणवत्ता धारक विद्यार्थ्यांची संख्या वाढली पाहिजे, या दृष्टीने सर्वांनी जोरदार काम करूया. विद्यार्थ्यांनी आपल्या स्वप्नांना कष्टाचे बळ दिले तर योग्य लक्ष्य साधता येतील. ज्या विद्यार्थ्यांना या वेळी कमी गुण मिळाले त्यांनी निराश न होता गौरवगुण प्राप्त करण्याकरिता प्रयत्न करावे असे यावेळी बोलतांना माजी नगरसेवक संजय कंचर्लावार म्हणाले.
तत्पूर्वी मान्यवरांचे स्वागत करण्यात आले व कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. भानापेठ प्रभागात सुमारे ३५ प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांना मेडल तसेच भेट वस्तू देऊन गौरव करण्यात आला. त्याच प्रमाणे प्रभागातील सुमारे ३०० विद्यार्थ्यांना नोटबुक भेट देऊन उज्वल शैक्षणिक भविष्याकरिता शुभकामना देण्यात आल्या.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री सुदर्शन बारापात्रे सर यांनी यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीते करीत मनोज गुजराथी, राकेश परिहार, गणेश धकाते, शुभम ठोंबरे, अक्षय बोकडे आदींनी अथक परिश्रम केले.