Home > Latest news > कोरोना रोगामुळे मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबाला महानगरपालिकेच्या घर टॅक्स व इतर सर्व प्रकारच्या करात सवलत द्या- युवासेना जिल्हा प्रमुख निलेश बेलखेडे यांच्या नेतृत्वाखाली युवासेना चंद्रपुर ची मागणी

कोरोना रोगामुळे मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबाला महानगरपालिकेच्या घर टॅक्स व इतर सर्व प्रकारच्या करात सवलत द्या- युवासेना जिल्हा प्रमुख निलेश बेलखेडे यांच्या नेतृत्वाखाली युवासेना चंद्रपुर ची मागणी

Give relief to the family who died due to corona disease in Municipal House Tax and all other types of taxes - Demand of Yuvasena Chandrapur under the leadership of Yuvasena District Chief Nilesh Belkhede

कोरोना रोगामुळे मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबाला महानगरपालिकेच्या घर टॅक्स व इतर सर्व प्रकारच्या करात सवलत द्या- युवासेना जिल्हा प्रमुख निलेश बेलखेडे यांच्या नेतृत्वाखाली युवासेना चंद्रपुर ची मागणी
X





महोदय, सप्रेम जय महाराष्ट्र!!

नूतन वर्ष २०२२ निमित्य चंद्रपूर नागरिकांना महानगरपालिका चंद्रपुर च्या वतीने दोन्ही लस पुर्ण करण्यार्षांना शास्ती कर माफीच्या भेटीसाठीचे आम्ही युवा सेने तर्फे स्वागत करतो. परंतु वर्ष २०२० पासून संपूर्ण देशावर कोरोना रोगाचे संकट ओढवून आलेले आहे आणि त्यात अनेकांचे परिवार आणि अनेकांचे रोजगार हे संपूर्णतः उध्वस्त झालेले असून महानगरपालिकाने दिलेली नूतन वर्षाची भेट हि फक्त कोरोना रोगाची प्रतिबंधात्मक लसीकरण केलेल्यांसाठीच सीमित न ठेवता कोरोना रोगामुळे संपुर्ण परिवार, घरचा करता प्रमुख मृत्युमुखी पडलेले असल्यास अश्या कुटुंबाला हि महानगरपालिकेच्या सर्व प्रकारच्या घर टॅक्स करात संपूर्णतः सवलत देण्यात यावी याकरिता युवासेना सचिव वरूनजी सरदेसाई ,कार्यकारिनी सदस्य रूपेशजी कदम, युवासेना विस्तारक त्रिपाठीजी तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख संदिपजी गिर्हे यांच्या मार्गदर्शनाखाली व युवासेना जिल्हा प्रमुख प्रा. निलेशजी बेलखेडे यांच्या नेतृत्वाखाली युवासेना शहर समन्वयक करन वैरागडे ,चिटनीस नगाजी गनफाडे यांनी चंद्रपुर मनपा आयुक्त, महापौर व स्थायी समिती अध्यक्ष संदिपजी आवारी यांची भेट घेऊन या विषयावर चर्चा करून निवेदन दिले. यावेळी युवासेना शिष्टमंडळाने कोरोना रोगाचे सावट हे अद्यापही आपल्या वरून हटले नाही आणि अश्या परिस्थितीत चंद्रपुर मनपा ने अश्या कुटुंबाना आर्थिक आधार द्यावा .याकरिता युवासेना चंद्रपुर च्या या मागणीवर मनपा स्थायी समिती सभापती संदीपजी आवारी यांनी युवासेनेची मागणी हि योग्य असून याबद्दल नक्कीच सकारात्मक विचार करून गरजूंना मदत केल्या जाईल असे म्हटले. यावेळी युवासेना शिष्टमंडळात युवासेनेचे उपशहर प्रमुख वैभव काळे,कुनाल आगडे,प्रतिक गायकवाड यांची उपस्थिती होती.

Updated : 31 Jan 2022 4:18 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top