Home > Latest news > गोदावरी नदी निर्मल वाहण्यासाठी सर्वांचे प्रयत्न आवश्यक- सिनेअभिनेता उदगीरकर

गोदावरी नदी निर्मल वाहण्यासाठी सर्वांचे प्रयत्न आवश्यक- सिनेअभिनेता उदगीरकर

Gōdāvarī nadī nirmala vāhaṇyāsāṭhī sarvān̄cē prayatna āvaśyaka- sinē'abhinētā udagīrakara

गोदावरी नदी निर्मल वाहण्यासाठी सर्वांचे प्रयत्न आवश्यक- सिनेअभिनेता उदगीरकर
X

गोदावरी नदी निर्मल वाहण्यासाठी सर्वांचे प्रयत्न आवश्यक- सिनेअभिनेता उदगीरकर

कोपरगाव- गोदावरी नदी अविरतपणे निर्मल वाहण्यासाठी सर्वांचे प्रयत्न आवश्यक असल्याचे मत प्रसिद्ध मराठी सिने अभिनेते चिन्मय उदगीरकर यांनी गेल्या तीन वर्षांपासून अविरतपणे कोपरगाव येथील गोदामाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदिनाथ ढाकणे, सौरभ मुंगसे, निलेश पाटील,सोमनाथ पाटील, प्रज्वल ढाकणे, वैष्णवी ढाकणे यांच्या कडून गोदावरी नदी स्वच्छतेचे कार्य सुरू असून शनिवार दि ५ फेब्रुवारी रोजी या स्वच्छता मोहिमेस १५० आठवडे पूर्ण झाली असून याप्रसंगी अभिनेते उदगिरकर यांनी प्रत्यक्ष स्वच्छता मोहिमेत सहभागी होत आपले मत व्यक्त केले.


कोपरगाव येथे गोदावरी नदी किनारी झालेल्या कार्यक्रम प्रसंगी सर्व प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते गोदावरी मातेची विधिवत पूजा करून महाआरती करण्यात आली. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योगपती कैलास शेट ठोळे, नाशिक येथील नमामि गोदा चे अध्यक्ष राजेश पंडित, दिग्दर्शक सुहास भोसले, पंचायत समिती गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे संदीप रोहमारे, अभिनेते चंद्रकांत शिंदे, डॉ.तुषार गलांडे, नारायण शेठ अग्रवाल, प्रदीप शेठ गुरली, डॉ. विनया ढाकणे, लायन्स क्लबचे अध्यक्ष राम थोरे, नगरपरिषद शहर अभियान व्यवस्थापक महारुद्र गालट, प्रा. शैलेश बनसोडे, सोमनाथ लोहकरे, अमित कुटे, अमोल बढे,राहुल सूर्यवंशी, रवींद्र कथले, सिद्धार्थ शेळके, वासिम चोपदार, विजय सांगळे, दीपक कदम, भाऊसाहेब गीते, विशाल गायकवाड, सागर केकान, अक्षय बढे आदीं प्रमुख मान्यवरासाह श्रीमान गोकुळचंद विद्यालयाचे विद्यार्थी शिक्षक उपस्थित होते.


याप्रसंगी उदगीरकर यांनी पुढे बोलताना सांगितले की, या भूतलावरील पाण्याचा प्रश्न कायमचा सोडवायचा असेल तर पावसाळ्यात पडणारे पाणी जास्तीत जास्त जमिनीत कसे मुरेल यासाठी प्रत्येकाने अधिकाधिक प्रयत्न करणे गरजेचे असून त्यासोबतच आपल्या शहरातून गावातून वाहणाऱ्या पवित्र अशा नद्यांचे पावित्र्य राखत तिच्या किनारी मोठ्या प्रमाणात देशी वृक्षांची लागवड करून त्यांची काळजी घेण्याचे आवाहन करत. आदिनाथ ढाकणे आपल्या गोदामाई प्रतिष्ठान तर्फे करत असलेल्या गोदावरी नदी स्वच्छतेचे कार्य प्रशंसनीय असून त्यांच्या या सामाजिक कार्यात सर्वांनी सहभाग घेऊन संपूर्ण गोदावरी पात्र निर्मल व किनारे हिरवीगार करण्यासाठी सहभाग नोंदवणे आवश्यक असल्याचे मत उदगीरकर यांनी व्यक्त केले.


सिनेअभिनेते चिन्मय उदगीरकर, चंद्रकांत शिंदे, आदिनाथ ढाकणे, संदिप रोहमारे आदी मान्यवरांच्या शुभहस्ते याप्रसंगी १५० व्या आठवडा निमित्ताने गोदावरी नदी पात्र मध्ये देशी प्रजातीचे कवट या वृक्षाची लागवड केली.


या स्वच्छता अभियानामध्ये कोपरगाव नगरपरिषदेचे सफाई मित्र, नोडल अधिकारी भालचंद्र उंबरजे, महारुद्र गालट, शहर समन्वयक गायत्री शहाणे आदींनी सहभाग नोंदवला.याप्रसंगी नमामि गोदाचे राजेश पंडित, कैलास शेठ ठोळे, गटविकास अधिकारी सूर्यवंशी यांनी देखील ढाकणे यांच्या कार्याची प्रशंसा करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश गोरे सर यांनी तर आभार गोदामाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदिनाथ ढाकणे यांनी व्यक्त केले.

Updated : 6 Feb 2022 7:04 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top