Home > Latest news > भारतीय वायुसेनेचे चार एयरक्रॉफ्ट प्लेन 8 पायलट सह यवतमाळच्या भारी विमानतळावर झाले दाखल

भारतीय वायुसेनेचे चार एयरक्रॉफ्ट प्लेन 8 पायलट सह यवतमाळच्या भारी विमानतळावर झाले दाखल

Four aircraft planes of Indian Air Force with 8 pilots landed at Bhari Airport in Yavatmal

भारतीय वायुसेनेचे चार एयरक्रॉफ्ट प्लेन 8 पायलट सह यवतमाळच्या भारी विमानतळावर झाले दाखल
X

भारतीय वायुसेनेचे चार एयरक्रॉफ्ट प्लेन 8 पायलट सह यवतमाळच्या भारी विमानतळावर झाले दाखल


यवतमाळ/भारतिय वायुसेनेच्या लाइट एडवेन्चर श्रेणीचे 4एयरक्राफ्ट विमान शनिवार 3 डिसेम्बर च्या सकाळी यवतमाळच्या भारी येथील जवाहरलाल दर्डा विमानतळावर दाखल झाले,सकाळी नऊ वाजताच्या सुमारास हवाईपट्टीवर हे प्लेन उतरले होते.आर्मी व वायुसेनेच्या वतीने सध्या 5 हजार कीलोमीटर हवाई प्रवासाचा विशेष जनजागरन अभियान सुरु आहे, या एयरक्राफ्टचा हवाई बेड़ा बोधगया वरुन उड़ान भरल्यानंतर काल नागपुर येथे दाखल झाला,या दरम्यान तेथून यवतमाळ होऊन नांदेड़ला जाण्यापूर्वी ईंधन व मेन्टेन्स कामासाठी भारी येथील एयरस्ट्रिप वर सकाळी हा हवाई बेड़ा उतरला होता.

उल्लेखनीय म्हणजे देशाच्या आजादीचे अमृत महोत्सवासोबतच सध्या भारतीय सेनेद्वारे भारतिय सेना सेवाकोर चे 11 वे पुनर्मिलन व सेनेच्या सेवा कोअरच्या 262 व्या वर्धापनानिमित्त आर्मी एडवेंचर विंग ने देशात माइक्रो लाइट एक्सपेंडिशन अभियान चालविला आहे,याच्या मागे देशातील जनता व युवकाँमध्ये देशभक्ति व देशसेवेची भावना वाढावी हा उद्देश्य ठेवण्यात आला आहे.देशसेवा व यासाठी जनजागरनाकरीता बोधगया वरुन हा आर्मी व वायुसेनेच्या वतीने हा हवाई अभियान सुरु करण्यात आला आहे,ही 4 लाइट एयरक्राफ्ट विमाने व यांच्या पायलटसची टीम तब्बल 5 हजार किलोमीटर हवाई यात्रा टप्प्या टप्प्याने पूर्ण करणार आहे,येत्या काही दिवसानान्तर कर्नाटक राज्यातील बेंगलुरु येथे या एयरक्राफ्टचा बेड़ा पोहोचेल,तेथून पुन्हा बोधगया रिटर्न्स होइल,तेथे या आर्मी हवाई जनजागरन व एडवेन्चर अभियानाचे समापन होईल.या दरम्यानच काल 2 डिसेम्बरला नागपुरच्या कामठी बेसवर हा लाइट विमानांचा बेड़ा दाखल झाला होता,तेथून या विमानांनी यवतमाळ करीता उड़ान भरली, शनिवार 3 डिसम्बर च्या सकाळी यवतमाळ नजिक भारी येथील जवाहरलाल दर्डा विमानतळावर या आर्मी जनजागरण व समारोह अभियानाचे हवाई जहाज एयरस्ट्रिप वर उतरले.


भारतीय आर्मीमधील या 4 एअरक्रोफ्ट सोबत भारतीय वायुसेनेचे आर्मी लाइट एडवेंचर चे नोडल ऑफिसर कैप्टन लक्ष्मीकांत यादव यांच्या नेतृवात 8 पायलट ची टीम पुढील हवाई यात्रेकरिता भारी विमानतळावर विमानात फ्यूल भरण्यासाठी व मेन्टेनेन्स करीता कामात जुटली होती.यादरम्यान 4 ही एयरक्राफ्ट चे देखभाल व निरीक्षण करीत पायलट्स व विशेषज्ञ टीम ने पार्टचे अवलोकन व मरम्मत कार्य केले,एका वेळी तब्बल 2 तासांचे हवाई प्रवास करणाऱ्या या विमानाना लागणारे विशेष प्रकारचे फ्यूल आर्मिकड़ून वाहनद्वारे येथे पाठविन्यात आले होते,येथे 4 ही एयरक्राफ्टमध्ये ईंधन भरण्यात आले,सोबतच पायलट्सच्या भोजन,नाश्ताची व्यवस्थाही करण्यात आली होती,यावेळी त्यांना विमानतळ येथे स्थानिक अधिकारी झोपाटे व एनसीसी कमांडो अधिकारी यांनी सहकार्य केले.


विशेष म्हणजे भारी एयरपोर्ट वर हलकया वजनाचे चार्टर्ड प्लेनच उतरतात,मात्र भारतीय वायुसेनेच्या दसत्यातील ही लाइट एडवेन्चर एयरक्रॉफ्ट प्लेन बहुतेक पहिल्यानंदाच उतरले होते,मात्र स्थानिक प्रशासनालासुद्धा याची माहिती नसल्याचे चित्र हवाई पट्टी परिसरात दिसत होते,या ठिकाणी कोणताही प्रशासनिक अधिकारी वा पोलिस नव्हते.बहुतेक स्थानिक प्रशासनाला सुद्धा ही वायुसेनेचे एयरक्राफ्ट येथे उतरत असल्याची पूर्वसूचना नव्हती,अशी माहिती सूत्राने दिली.दुपारी 2 वाजताच्या दरम्यान या 4 ही एरोप्लेन घेवून पायलट्सची टीमने नांदेड़च्या दिशेने उड़ान भरली.

Updated : 3 Dec 2022 10:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top