चिंचोली येथील दोन धाडसी मुलांच्या प्रयत्नाने नदीत बुडणाऱ्या दहा लोकांचे प्राण वाचविल्या बद्दल माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी ग्रामस्थांसह केला त्यांचा सत्कार.
Former MLA Prof. Raju Timande felicitated the villagers for saving the lives of ten people who drowned in the river due to the efforts of two brave children from Chincholi.



हिंगणघाट प्रतिनिधी सचिन ठरकर
चिंचोली येथील दोन धाडसी युवकांनी नदीमध्ये बुडणाऱ्या १० लोकांचे प्राण वाचविल्यामुळे माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी चिंचोली येथील ग्रामपंचायत मध्ये शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते.
चिंचोली नदी घाटावरील बालाजी मंदिर नदीच्या तीरावर पूजा करण्याकरिता घाटसावळी येथून श्री संत नगाजी महाराज पालखी चिंचोली या गावी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पालखी वना नदीच्या पात्रातून जात असताना अचानक नदीचे दोन माणूस एवढे पाणी वाढले व पालखी नदीमध्ये बुडायला लागली. पालखीसोबत घाटसावली गावचे धारकरी लोक पालखी पोहोचून देण्यासाठी नदीमध्ये उतरले होते ते सुद्धा पालखीसोबत नदीमध्ये बुडायला लागले. त्यावेळी चिंचोली गावातील दोन धाडसी युवक सचिन पडाल व दहाव्या वर्गात शिकणारा १५ वर्षाचा प्रज्वल कुमरे या दोघांनी जीवाची बाजी लावून नदीमध्ये उड्या टाकल्या व बुडत असलेल्या घाटसावली गावातील चार ते पाच युवकांचे व गृहस्थांचे असे दहा लोकांना सुखरूप बाहेर काढले व प्राण वाचविले त्यावेळी सोबत पवन देविदास गायकवाड सह उपस्थित असलेले गावातील युवक यांनीसुद्धा सहकार्य केले. या धाडसी पराक्रमामुळे सुमारे दहा लोकांचे जीवन वाचले. त्यामुळे त्यांचे सर्वस्व कौतुक होत आहे.
म्हणुन त्यानिमित्त माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी या कर्तबगार दोन युवकांचा सत्कार केला व *माजी आमदार तिमांडे यांनी आपले मत व्यक्त करत असताना बोलले की चिंचोली ग्रामपंचायत तर्फे या दोन्ही कर्तबगार युवकांचा केंद्र व राज्य सरकारने पुरस्कार देउन सत्कार करण्याबाबतचा ठराव मंजूर करून ठरावची प्रत मला आणून द्यावे ती प्रत जोडून मी माझ्या पत्राद्वारे राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल भगतसिंग कोशायरी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मागणी करू की या घटनेमध्ये प्राण वाचविणाऱ्या सचिन पडाल व अवघ्या दहाव्या वर्गात असलेला १५ वर्षाच्या प्रज्वल कुमरे या दोघा युवकांना बाल शौर्य पुरस्कार अथवा इतर सन्मानकारक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात यावे* व अशा अनेक घटना घडत असतांना युवकांमध्ये प्राण वाचवण्याची ऊर्जा निर्माण होईल तसेच भविष्यामध्ये महत्त्वाचं ठरेल असे मत त्यांनी व्यक्त केले त्यावेळी चिंचोलीचे सरपंच दिलीप राऊत,गौरव तिमांडे,अरुण बोबडे, सचिन सोनटक्के, पुरुषोत्तम झाडे ,युवराज माऊसकर,मारोती शिंदे, रमेश सोनटक्के,अशोक गायकवा, सागर सोनटक्के, पुरुषोत्तम तुराळे, मोहन भोयर,शुभम तुराळे,अरुण तुराळे,जानबा लोणारे,नरेश चौधरी,मधुकर खाडे,संजय तेलांडे, सुनील खाडे, बाबा तूराळे, राजू उमक इत्यादी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.