उमरखेड तालुक्यात आवकाळी पावसासह गरपीटमुळे शेतकऱ्यावर आर्थिक संकट!
हरबरा व गव्हाचे मोठ्ठया प्रमाणात नुकसान..
X
उमरखेड तालुक्यात आवकाळी पावसासह गरपीटमुळे शेतकऱ्यावर आर्थिक संकट!
---------------------------------
हरबरा व गव्हाचे मोठ्ठया प्रमाणात नुकसान..
----------------------------------
उमरखेड तालुक्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटव मागील दोन दिवसापासून होणाऱ्या वातावरण बदलामुळे शेतकरीवर्ग चांगलाच चिंतेत होता. कारण ऊस पीक गेल्यानंतर लागलीच शेतकरी वर्गाने गहू व हरभरा या पिकाची पेरणी केली होती. मागील अतिवृष्टी मुळे उसापासून पाहिजे त्या प्रमाणात उत्पन्न न झाल्यामुळे शेतकरी वर्ग परेशान होता. म्हणूनच ऊस कारखान्याने नेण्यासाठी आर्थिक देवाण -घेवाण करून ऊस कारखान्याला दिला. कारण लागेल गहू व हरभरा पिक घेऊन कुठेतरी आपली बरोबरी होईल व दोन पैसे उरतील या हेतूने पेरणी केली. व त्याचे संगोपन सुद्धा केले. वmमात्र ते पीक हाती येताच निसर्गाचा प्रोकोप होऊन अवकाळी पाऊस व गरपीट झाली व हाती आलेले पीक क्षणात होत्याचे नव्हते झाले पूर्ण नस्ट झाले.म्हणजेच शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिसकावला सारखे झाले. त्यामुळे शेतकरी चांगलाच हतबल झाला असून. चिंतेत आहे. सरकार यावर काय तोडगा काढेल याकडे लक्ष धरून आहे...
प्रतिनिधी किरण मुक्कावार उमरखेड यवतमाळ