Home > Latest news > पांढरकवडा येथे २२ सप्टेंबरला शिवसेना प्रवक्ते यांचा उपोषण सत्त्याग्रह

पांढरकवडा येथे २२ सप्टेंबरला शिवसेना प्रवक्ते यांचा उपोषण सत्त्याग्रह

Fast Satyagraha by Shiv Sena spokesperson on September 22 at Pandharakawda

पांढरकवडा येथे २२ सप्टेंबरला शिवसेना प्रवक्ते यांचा उपोषण सत्त्याग्रह
X

दिनांक २१ सप्टेंबर २०२२

पांढरकवड्यातील राजकीय, सामाजीक व प्रत्येक ठिकाणी साचलेली घाण दूर करण्यासाठी ,शहरातील गुंडाराज ,लँड माफीया ,खंडणी वसुली करणाऱ्या असामाजिक उपद्रवाचा बंदोबस्त करण्यासाठी , तसेच आंबेडकर वस्तीसह सर्व प्रलंबित घराचे पट्टे देण्याबाबत ,सर्वांना निराधार व अन्न सुरक्षा मिळण्याबाबत ,नगरपरिषदेमध्ये मागील पाच वर्षात आलेल्या निधी व कंत्राट सह केलेल्या खर्चाची स्वतंत्र ऑडीट व चौकशी करण्यासाठी तसेच पोलीस बंदोबस्तात राजरोसपणे सुरु असलेला वरळी मटका ,क्रिकेटचा मटका बंद करण्यासाठी सामाजीक कार्यकर्ते व शिवसेनेचे राष्ट्रीय प्रवक्ते किशोर तिवारी २२ सप्टेंबरला बौद्ध विहार समोर ,आंबेडकर वॉर्ड पांढरकवडा येथे उपोषण सत्त्याग्रह करणार आहेत त्यांच्यासोबत आदिवासी नेते अंकीत नैताम सुद्धा सहभागी होतील

मागील ३० वर्षापासुन जमिनीच्या पट्ट्याचा प्रश्न प्रलंबित

मागील ६० वर्षापासुन नझुल जागेवर दलीत व मादगी समाजाचे शेकडो कुटुंब राहत आहे .संपुर्ण चौकशी करून व कायदेशीर बाजु तपासल्यानंतर तसेच नगर परिषदने जमिनीचे पटटे व घरकुल देण्याचा प्रस्ताव दिल्ल्यानंतरही पैसे देत नसल्यामुळे या अतिशय गरीब वंचीत लोकांना त्यांच्या टक्काचे घरकुला पासुन वंचित ठेवत आहेत .आम्ही मागील २० वर्षापासुन प्रशासनाचा दारावर चपला घासत आहोत मात्र आम्ह्चे काम फुकटात करण्यास कोणीही करत नसुन आता आम्हाला भर पावसात रस्त्यावर उपोषण करावे लागत आहे ,आतातरी अधिकाऱ्यांनी जागावे अशी विनंती प्रकाश रामटेके, भाऊराव मेश्राम, मिराबाई खोब्रागडे, सुभद्राबाई काळे, मंगला खोंडे, जगदीश प्रजापती, दत्ता उत्कंडे, चिनय्या अवणुरवर, संतोष रामटेके, पवन मेश्राम यांनी केली आहे .

आदीवासी व आदिम आदीवासी जमिनीच्या पट्ट्यापासून व घरकुला पासून प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे प्रलंबीत

आदीवासी व आदिम आदीवासी जमिनीच्या पट्ट्यापासून व घरकुला पासून प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे प्रलंबीत असुन याला अधिकार्यांच्या नाकर्तेपणा जबाबदार असल्याचा आरोप आदिवासी नेते अंकीत नैताम यांनी यावेळी केला जर सरकारने आम्ह्चे अधिकाराचे घरकुल व जमिनीचे पट्टे दिले नाही तर आम्ही हे उपोषण सत्त्याग्रह आमरण उपोषणामध्ये पुढे सुरु ठेवु असा गंभीर इशारा यावेळी विशाल मेश्राम, सुधाकर जंगलवार, माया मेश्राम, रमेश आत्राम, रेशमा गेडाम, देवनाथ गेडाम, काशिनाथ उपरे, व्यंकटी सातुरवार,मलय्या अवणुरवार, नरसिंग कुटलवार, अशोक गुम्मडवार, रवि कनकुटंलावार, नरसिंग कुरेवार, राजांना बतलवार हणमंतू अडूरवार, देवाजी रामटेके, समाधान रामटेके, रवि रामटेके, वसंतराव रामटेके, संतोष गेडाम,दशरथ मेश्राम, महेश गेडाम नंदकुमार वड्डे या वंचीत दलीत व माडगी समाजाच्या नागरीकांनी यावेळी दिला .

प्रशासकीय अनागोंदी कारभार व राजरोसपणे सूर असलेला भ्रष्टाचारा समुळ समाप्त करा -किशोर तिवारी

पोलीस बंदोबस्तात राजरोसपणे सुरु असलेला वरळी मटका ,क्रिकेटचा मटका बंद तात्काळ बंद करणे ,खंडणी व ब्लॅक मेल करून लुटणाऱ्यांची टोळी शहरात सक्रिय झाली आहे .चिड्डीमार गॅंग बिनधास्त हैदौस गावात घालत असुन आई बहिणींचे रस्त्यावर फिरणे कधीं झाले आहे .कॉलेज व शाळेच्या रस्तावर गुंड मुलीना त्रास देतात मात्र पोलीस २४ तास फक्त वसुली करतात अशा परिस्थितीमध्ये आता जनतेनी कायदा हातात घेण्याची वेळ आली असून जर उपोषण सत्त्याग्रहानंतरही परिस्थिती बदलली नाही तर आम्ही अधिकाऱयांना "बदडा आंदोलन 'सुरु करू असा इशारा किशोर तिवारी यांनी यावेळी दिला.

Updated : 21 Sep 2022 12:46 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top