Home > Latest news > शेतकरी नेते सिकंदर शहा यांना किसान रत्न पुरस्कार दिल्ली येथे सन्मानित करणार

शेतकरी नेते सिकंदर शहा यांना किसान रत्न पुरस्कार दिल्ली येथे सन्मानित करणार

Farmer leader Sikandar Shah will be honored with Kisan Ratna award in Delhi

शेतकरी नेते सिकंदर शहा यांना किसान रत्न पुरस्कार दिल्ली येथे सन्मानित करणार
X

प्रतिनिधी यवतमाळ

केन्द्र सरकारने पारीत केलेल्या तीन काळया कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन करुन संयुक्त किसान मोर्चाला साथ देणा-या सिकंदर शहा यांना किसान रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम दिनांक 22 फेब्रुवारी रोजी दिल्ली येथील कॉन्स्टीटयुशन क्लब ऑफ इंडीया च्या सभागृहात संपन्न होणार आहे.

केन्द्र सरकारने दिनांक 20 सप्टेंबर 2020 रोजी कृषी क्षेत्राशी संबंधीत तीन कायदे पारीत केले. या तिन कायद्यांविरोधात देशभर प्रचंड संताप व्यक्त केला गेला. हे कायदे व्यापार धार्जीने असून त्यामुळे शेतक-यांची प्रचंड लुट होणार असल्याचा आरोप करीत संयुक्त किसान मोर्चाने दिल्ली च्या सिमेवर आंदोलन सुरु केले. या आंदोलनाला साथ देत यवतमाळ येथील शेतकरी वारकरी संघटनेचे अध्यक्ष सिकंदर शहा यांनी सुध्दा यवतमाळ येथे विविध प्रकारे आंदोलन करुन सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. हे तुघलकी कृषी कायदे परत घेण्यासाठी तसेच केन्द्र सरकारविरुध्द बिगुल फुंकण्यासाठी यवतमाळात दिनांक 23 सप्टेंबर रोजी शेतकरी वारकरी संघटनेचे सिकंदर शहा यांनी बैलबंडी मोर्चा काढला. याशिवाय उपोषण, मुक सत्याग्रह, कापूस पेटवा आंदोलन यासह अनेक आंदोलने केली. देशभर पेटलेल्या या आंदोलनामुळे पंतप्रधान मोदी यांना काळे कृषी कायदे परत घेण्याची घोषणा करावी लागली. हा विजय म्हणजे भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकाराचा तसेच महात्मा गांधी यांनी सुचविलेल्या अहिंसेच्या मार्गाने केलेल्या आंदोलनाचा विजय होता. विशेष म्हणजे देशातील विविध भागात आंदोलन करुन सरकारला काळे कायदे परत घेण्यास भाग पाडण्यात आले. त्यामुळे सिकंदर शहा यांचा सुध्दा किसान विजय उत्सव समितीच्या वतीने किसान रत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. या समितीचे संयोजक शेतकरी नेते विनायक पाटील हे असून त्यांनी सिकंदर शहा यांना पुरस्कार स्विकारण्यासाठी दिल्ली येथे निमंत्रीत केले आहे.

अनेक मागण्या प्रलंबित

केन्द्रातील मोदी सरकारची धोरणे ही शेतकरी विरोधी आहे. त्यामुळे देशातील शेतकरी आर्थीक दृष्टया हतबल झाला आहे. शेतक-यांना पिकाच्या उत्पादन खर्चापेक्षा पन्नास टक्के जादा भाव मिळणे गरजेचे आहे. पंतप्रधान पिकविमा योजनेचा लाभ दिल्या जात नाही. किमान आधानभूत किंमत यासह अनेक मागण्या अजुनही प्रलंबित आहे. त्यामुळे शेतक-यांना न्याय मिळेपर्यन्त लढा सुरुच ठेवावा लागणार आहे.

सिकंदर शहा

शेतकरी वारकरी संघटना


Updated : 17 Feb 2022 7:18 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top