Home > Latest news > साखरा येथे सेवालाल जयंतीनिमित्त नेत्ररोग तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर

साखरा येथे सेवालाल जयंतीनिमित्त नेत्ररोग तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर

Eye examination and surgery camp on the occasion of Sewalal Jayanti at Sakhara

साखरा येथे सेवालाल जयंतीनिमित्त नेत्ररोग तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर
X

दिग्रस:-तालुक्यातील साखरा येथे बंजारा समाजाचे दैवत संत श्री सेवादास महाराज यांच्या २८३व्या जयंतीचे औचित साधून नेत्ररोग तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले,यात साखरा,खेकडी,लिंगी येथील रुग्णांनी मोफत नेत्रतपासणी केली त्यातून सोमवारी मेघे सावंगी येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी(मेघे)वर्धा येथे रुग्णांची शस्त्रक्रिया होणार आहे त्याकरिता रुग्णालयातर्फे मोफत बसची सुविधा केली असून एकुण ७५ रुग्ण सोमवारी वर्धा येथे जाणार आहे.

संत सेवादास महारांच्या जयंतिनिमित्त येथील गरिब,गरजु रुग्णांची सेवा करता यावी म्हणुन येथील सेवादास उत्सव समिती,कर्मचाचारी सेवा संघ साखरा,वसंत प्रतिष्ठाण तसेच ग्रां.पं.साखरा,संत ज्ञानेश्वर माऊली मंडळ यांच्या पुढाकाराने तसेच आचार्य विनोबाभावे रुग्णालय सावंगी मेघे यांच्या सहकार्याने शिबीर पार पडले.

या शिबीराच्या यशस्वीतेसाठी कर्मचारी सेवा संघाचे अध्यक्ष डॉ.विनोद आडे,अर्जुनकारभारी,सुंदरसिंग नाईक,ललीतनाईक,माणिक चव्हाण,आत्माराम जाधव,विजय महाराज तसेच ग्रां.पं.सदस्य श्री विशाल चव्हाण,अमोल राठोड,पवन,व,गोपाल जाधव,विरज आडे यांच्या सहकार्याने यशस्वीपणे पार पडले.

दिग्रस - प्रतिनीधी

Updated : 19 Feb 2022 8:25 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top