डॉ. धर्मकारे यांची हत्या ही प्रत्येक डॉक्टरांच्या हृदयावर आघात करणारीच आहे - मधुसुदन उत्तरवार
सदर प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्याची पत्रकार परिषदेतून मागणी
X
उमरखेड :- 11 जानेवारी रोजी घडलेली घटना ही निंदनीय व वेदना देणारी होती. आपल्या सर्वांचे लाडके डॉ. धर्मकारे यांची जी हत्या करण्यात आली. या घटनेतील आरोपीला लवकरात लवकर पकडून फास्टट्रॅक न्यायालयामध्ये समोर खटला ठेवून त्याला लवकरात लवकर फाशी देण्यात यावी. एका डॉक्टरची हत्या केली नसून अनेकांच्या हृदयावर आरोपीने आघात केला आहे असे प्रतिपादन राजाराम प्रभाजी उत्तरवार उपजिल्हा रुग्णालय चे रुग्ण कल्याण समिती सदस्य मधुसूदन उत्तरवार यांनी विश्रामगृह येथे आज दिनांक 27 जानेवारी रोजी आयोजित पत्रकार परिषदेत केले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, डाँ. धर्मकारे यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे तो कधीही भरून निघणार नाही. जसे भारतीय सीमेवर एखाद्या सैनिकांची हत्या करण्यात येते त्यांना वीरमरण प्राप्त होते तो देशासाठी सेवा करतो तसेच वैद्यकीय अधिकारी, नर्स , कर्मचारी देशाची लोकांची सेवा करतो अशा डॉक्टर धर्मकारे यांना एखाद्या वीर सैनिकाप्रमाणे त्यांचा प्राण गेला त्यांचे बलिदान हे व्यर्थ जाणार नाही, त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. माझी शासनाला प्रमुख मागणी आहे, डॉक्टर धर्मकारे यांच्या कुटुंबाला शासनाने आर्थिक मदत 50 लाखाची त्वरित द्यावी व त्यांच्या पत्नीला शासनामध्ये नोकरी देण्यात यावी.
आज हॉस्पिटल मध्ये कर्मचारी, डॉक्टर यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. उमरखेड पोलिस प्रशासनाने रूग्णालयात पोलीस चौकी निर्माण करून हॉस्पिटलला 24 तास संरक्षण प्रदान करावे.
प्रशासनाने हॉस्पिटल समोरचे अतिक्रमण तात्काळ काढून घ्यावे जेणेकरून रुग्णालयाच्या चारही बाजूने संरक्षक भिंत उभारून रुग्णालयासाठी संरक्षण निर्माण करता येईल. अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी रुग्णालयात व परिसरात सीसीटीव्ही कॅमेरा यंत्रणा तयार करावी त्यासाठी लागणारा निधी आहे तो पण शासनाने लवकरात लवकर द्यावा. अशा प्रकारच्या विविध मागण्या करून आजोबाने शासनाला दिलेल्या जमिनीवर आज सुसज्ज दवाखाना उभारला आहे त्यामध्ये लवकरात लवकर पदभरती करून सामान्य रुग्णांना सेवा पुरवावी अशी अपेक्षाही मधुसूदन उत्तरवार यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी त्यांच्या समवेत दशरथ मत्ते आणि किरण मुक्कावार प्रकाश लोमटे यांची उपस्थिती होती.
दिनांक 25 जानेवारी रोजी औदुंबर पत्रकार बहुउद्देशीय संस्था द्वारा संचालित दैनिक वृत्तपत्र वार्ताहर संघ ( अधिकृत ) या संघाची नवीन कार्यकारणी गठीत करण्यात आली. असून नवनियुक्त अध्यक्ष अजहर खान व सचिव लक्ष्मीकांत नंदनवार, यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
तसेच विश्राम गृह येथिल कार्यरत असलेले खानसामा खालील भाई यांचा आहेर देऊन सन्मान रुग्ण कल्याण समिती सदस्य मधुसूदन उत्तरवार यांनी केला.