जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन वार्षिक प्रकाशनाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते विमोचन
District Social and Economic Criticism Annual Publication Release at the hands of the Guardian Minister
X
चंद्रपूर,दि. 27 जानेवारी: जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन-2021 या प्रकाशनाचे विमोचन आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते दि.26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी करण्यात आले.
याप्रसंगी खासदार बाळू धानोरकर, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी, अपर पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, जिल्हा नियोजन अधिकारी ग.रू. वायाळ तसेच जिल्हा सांख्यिकी अधिकारी अमित सुतार उपस्थित होते.
सदर प्रकाशन अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या संकेतस्थळावर तसेच जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद, चंद्रपूर यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सदर प्रकाशनात 3 भाग असून त्यामध्ये 11 प्रकरणे आहे. प्रत्येक प्रकरणात जिल्ह्यातील विविध विषयांवरील विस्तृत आकडेवारी उपलब्ध आहे. जिल्हयाची भौगोलिक माहितीसह काही ठळक बाबी प्रकाशनाच्या पहिल्या भागात दिलेल्या असून चंद्रपूर जिल्हा व महाराष्ट्राची माहिती दृष्टीक्षेपात देण्यात आलेली आहे.
प्रकाशनाच्या दुस-या भागात जिल्हयातील विविध सामाजिक व आर्थिक क्षेत्रांच्या स्थिती बाबतची माहिती सांख्यिकीय आकडेवारी तक्त्यांच्या स्वरूपात दिलेली आहे. यामध्ये जिल्ह्यातील निवडक निर्देशक, जिल्हा उत्पन्न अंदाज, जिल्ह्यातील किंमती व सार्वजनिक वितरण व्यवस्था, जमीन व इतर महसूल, स्थानिक स्वराज्य संस्थांचे उत्पन्न/खर्च, बॅंक व विमा, बचतगट, कृषि विषयक आकडेवारी, पदुम, जिल्ह्यातील जलसंपदा व लाभक्षेत्र, वने व पर्यावरण, उद्योग व सहकार, पणन, वस्त्रोद्योग बाबत आकडेवारी, पायाभूत सुविधांमध्ये उर्जा, प्रादेशिक परिवहन व दळणवळण, सार्वजनिक बांधकाम, पाणी पुरवठा व स्वच्छता विषयक आकडेवारी, सामाजिक क्षेत्रे व सामूहिक सेवा अंतर्गत शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, महिला व बालविकास, गृहनिर्माण, सामाजिक न्याय, अल्पसंख्याक विकास, मदत व पुनर्वसन विषयीची आकडेवारी, योजनाविषयक आकडेवारी मध्ये विविध विकास योजना, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना बाबतची आकडेवारी तसेच संकीर्णमध्ये न्याय व प्रशासन, माहिती व जनसंपर्क, निवडणुकीबाबत, वित्त, पर्यटनाबाबत आकडेवारी आहे.
तिस-या व शेवटच्या भागात जनगणना, कृषीगणना, पशुगणना व आर्थिक गणनेबाबतची सांख्यिकीय तक्ते उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
जिल्हयातील केंद्र पुरस्कृत योजना, राज्य शासनाच्या योजना, जिल्हा परिषदेकडील योजना, विशेष घटक योजना, आदिवासी घटक कार्यक्रम इ. राबविण्यासाठी तसेच विविध शासकिय, निमशासकिय, खाजगी कार्यालये, शैक्षणिक संस्था, संशोधक, विद्यार्थी, नागरिक इत्यादी घटकांना हे प्रकाशन उपयुक्त ठरेल अशी अपेक्षा आहे.