Home > Latest news > लोहारा महिला पोलीस स्टेशन मध्ये सॅनिटरी न्यापकीन चे वाटप.

लोहारा महिला पोलीस स्टेशन मध्ये सॅनिटरी न्यापकीन चे वाटप.

जीवनदान फाऊंडेशन चे स्तुतिनिय कार्य.

लोहारा महिला पोलीस स्टेशन मध्ये सॅनिटरी न्यापकीन चे वाटप.
X

यवतमाळ: जीवनदान फाऊंडेशन पुणे सलंगण यवतमाळ यांच्या माध्यमातून गेल्या आठ महिन्या 'एक हात मदतीचा'या मार्फत विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. त्याच अनुषंगाने दिनांक 26 जानेवारी 2022 प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून नुकतेच स्थापित झालेले लोहारा महिला पोलीस स्टेशन फक्त महिलांचा सहभाग असून येथील सर्व कार्य महिला पोलीस अधिकारी ते शिपाई ड्रायव्हर ते इतर सर्व कार्य येथील महिला कर्मचारी करतात त्यामुळे महिलांवर ती संपूर्ण पोलिस स्टेशनची जबाबदारी असल्याने चाणाक्षपणा ने महिलांना कार्य करावे लागते.


त्यात महिलांचे मासिक पाळीचे सुद्धा काही दिवस असतात त्यामुळे त्यांना तो वेगळा मानसिक ताण सहन करावा लागत असतो या मानसिक तणावाला थोडा आधार मिळावा याकरिता जीवनदान फाउंडेशन च्या अध्यक्ष ओमप्रकाश सोनवणे (पुणे) व सुरज लोंढे, अमोल जोगदंड रोशनी लोंढे,आकांक्षा लोंढे,पूजा जोगदंड,कल्पना इंगोले,उमेश राऊत,स्वाती डोगर, इतर महिलापदाधिकारी यांच्यामार्फत लोहारा पोलीस स्टेशन येथील सर्व महिला कर्मचाऱ्यांना सॅनेटरी नॅपकिन व N 95 माक्स वाटप करण्यात आले. ही सर्व समाजाची नैतिक जबाबदारी समजून त्या दिवसातील महिलांकडून होणारा ताणतणाव काही प्रमाणात कमी करण्याचा मानस बाळगून या सेवाभावी संस्थेने कार्य हाती घेतले आहे.


सॅनिटरी नॅपकिन वापराला १८८० नंतर सुरुवात झाल्याचा उल्लेख आढळतो. हे नॅपकिन्स अस्तित्वात येऊन सुमारे सव्वाशे वर्षे झाली असली तरी अजूनही भारतात ते सर्व स्तरांपर्यंत पोहोचू शकलेले नाहीत. एकीकडे पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून स्त्री उभी आहे वगैरे दावे होताना दुसरीकडे दर महिन्याला तीन ते चार दिवसाचे आयुष्य केवळ सोयींच्या अभावामुळे अंधाऱ्या खोलीमध्ये, घरातच काढावे लागते हे कोणत्या समानतेचे चिन्ह आहे हा प्रश्न निर्माण होतो. तसेच मुलींच्या सोयीसाठी शाळांमध्ये सॅनिटरी नॅपकिनची सोय करून देण्यात आली आहे. शाळांमध्ये ही सोय सामाजिक संस्थांच्या माध्यमातून सुरू करण्यात आली आहे. मात्र महाविद्यालयांमध्ये गेल्यावर काय, हा प्रश्न उरतो. महाविद्यालयांमध्ये गेल्यावर पुन्हा त्यांनी आर्थिक अडचणीमुळे कापडाकडे वळायचे का...

गेल्या वर्षभराच्या काळात सॅनिटरी नॅपकिन्सचा विषय हा कुजबुजत्या स्वरातून, अपराधीपणाची भावना घेऊन होणाऱ्या चर्चेतून बाहेर पडत आहे. कमावत्या महिलांमध्ये, शाळा-महाविद्यालयांमध्ये जिथे खुले वातावरण आहे तिथे मित्रांशीही या विषयांवर बोलायला कोणताही संकोच होत नसल्याने याबद्दल जाणीवनिर्मिती होत आहे. हा बदल सकारात्मक आहे. तरीही याचे वर्तुळ अजूनही लहानच आहे. हक्काच्या जगण्यावर, हक्काच्या मोकळ्या वागण्यावर ही अनावश्यक करबंधने असल्याने याचे वर्तुळ अधिक वेगाने विस्तारण्यावर मर्यादा येत आहेत. चैन म्हणून याकडे पाहण्याची मानसिकता बदलली तर महिला आणि मुली खऱ्या अर्थाने मुक्ता म्हणून जगू शकतील.

या कार्यक्रम प्रसंगी ठाणेदार दीपाली भेंडे,कल्पना मिर्झापुरे,शिल्पा खडसे,मेघा ढवळे, रेणुका सांगळे, वनिता पाटील व इतर महिलांकर्मचारी उपास्तीत होत्या.विशेष सहकार्य जमादार दत्तात्रय किनाके,शरद सातारकर यांचे लाभले.

Updated : 27 Jan 2022 11:38 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top