Home > Latest news > दिल से सैल्यूट अश्या कर्मचाऱ्याला ग्रीन पार्क बार कर्मचार्याचा प्रामाणिकपणा 19800 रुपयांचे पॉकेट पोलीसांना सुपूर्द

दिल से सैल्यूट अश्या कर्मचाऱ्याला ग्रीन पार्क बार कर्मचार्याचा प्रामाणिकपणा 19800 रुपयांचे पॉकेट पोलीसांना सुपूर्द

Dil se salute to such an employee The sincerity of the Green Park bar staff 19800 rupees pocket handed over to policeचंद्रपुर :- पैसा दिसला की माणसाची नियत बिघडते, अशी मानवी प्रवृत्ती आहे असे बोलले जाते, परंतु हे सर्वस्वी खरे नाही असे एका अल्प वेतनात बार मध्ये काम करणाऱ्या वेटर ने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.

चंद्रपुर मूल मार्गावरील लोहारा येथे बरेच हॉटेल आहेत, शहरातील नागरिक परिवारासह विरंगुळा करण्यास येथील अनेक हॉटेल मध्ये जेवणाच्या आस्वाद घेण्यास जात असतात अशातच तेथील

ग्रीन पार्क बार रेस्टॉरेन्ट अॅण्ड लोहारा या बारचे संचालक गणेश वसंत गोरडवार यांचे मालकीचे असून यात शरीफ उल शेख हा कामगार वेटर म्हणून काम करतो, त्या शरीफ वेटरला बार च्या वॉश रूम मध्ये एक व्हॅलेट (पर्स, पॉकेट) आढळला त्यामध्ये १९,८०० /- रोख रक्कम होती, परंतु शरीफ ने आपला प्रामाणिकपणा जपत ते पैशाचे पाकीट मिळाले याची असे बार मालक गणेश गोरडवार यांना कळवली गोरडवार यांनीही क्षणाचाही विलंब न करता सदर बाब थेट रामनगर पोलीस ठाणे गाठत रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश मुळे यांना सुपूर्द केली.
आज दिनांक २४/११/२०२२ रोजी पोलीस स्टेशन रामनर येथे ग्रीन पार्क बार रेस्टॉरन्ट अॅण्ड लॉन मुल रोड लोहारा चंद्रपुर चे मालक गणेश वसंत गोरडवार आपल्या सोबत बार व लॉन मध्ये काम करणारा कामगार नामे शरीफ उल शेख रा. ग्रीन पार्क लोहारा चंद्रपुर हाजर होवुन सांगितले की, दिनाक २२/११/२०२२ चे १०/०० वा. रात्रीला त्याचे ग्रीन पार्क बार रेस्टॉरन्ट अॅण्ड लॉन मध्ये त्याचेकडे कामावर असलेला कामगार मुलगा नामे, शरीफ उल शेख यास काळया रंगाचा वॅलेट मिळालेला आहे. तो कोणत्या तरी ग्राहकाचे वाशरूम मध्ये पडुन मिळाल्याने त्यास परत करणे आहे.

त्यावरून पोलीस निरीक्षक राजेश मुळे पोलीस स्टेशन रामनगर ने सदर व्हॅलेट चे पाहणी करून सबंधीताचे तात्काळ शोध घेवून त्याचे मो.क ७९७२९२९३८० वर फोनवर विचारपुस केले असता त्यानी आपले नाव सुनिल घोडमारे, नगरपरीषद हिंगणघाट रा.. संत ज्ञानेश्वर वार्ड, हिंगणघाट असे सागितले. आणि सदर पॅकेट घेण्याकरीता त्याचा मित्र नामे प्रशात दादाजी धोडरे रा. नागाडा चंद्रपुर यास पाठविल्याने त्यांची पोलीस स्टेशन रामनगर येथे खात्री करून त्याना सदर रक्कम व व्हॅलेट सुपूर्त केले.

सुनिल घोडमारे यांनी स्वईच्छेने त्या कामगार मुलाला प्रोत्साहन म्हणुन ५,०००/- रोख रक्कम बक्षिस म्हणुन दिले.

गणेश वसंत गोरडवार, ग्रीन पार्क बार रेस्टॉरेन्ट अॅण्ड लॉन मुल रोड लोहारा चंद्रपुर या लॉन मध्ये काम करणारा कामगार मुलगा शरीफ उल शेख यानी जी माणुसकीचे दर्शन दाखवुन पैसा हा महत्वाचा नसुन माणुसकी महत्वाची आहे, आणि मालकासाठी ग्राहक हे देव असतो ते त्यांनी या प्रकारे आपल्या कडे काम करणाऱ्या कामगाराला शिकवण देवुन दाखविले आहे. एका अनओळखी व्यक्तीचे रक्कम पो.स्टे.ला आणुन जमा केली, त्यामुळे संबधीत व्यक्तीचे एव्हढी मोठी रक्कम व व्हॅलेट परत करता आले आहे.

रामनगर पोलीस स्टेशन तर्फे त्याचे प्रोत्साहनपर आभार करण्यात आले.

Updated : 25 Nov 2022 10:46 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top