धनराज कोवे मित्र परिवारचा उपक्रम म्हणजे शिवरायांना ३६५ दिवस मानवंदना-डॉ. गुलवाडे *असा स्तुत्य उपक्रम राबविणे ही काळाची गरज -राजेश सोलापन
Dhanraj Kove Mitra Parivar's initiative is to pay homage to Shivratri for 365 days. Flowers * It is a need of the hour to carry out such commendable activities - Rajesh Solapan
X
हिन्दवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती प्रित्यर्थ धनराज कोवे मित्र परिवाराच्या माध्यमातून ज्ञानमंधन कोचिंग क्लासेसच्या सहकार्याने १००० गरीब विद्यार्थ्यासाठी इंग्लिश स्पोकन क्लासेसचा कोर्स मोफत देण्यात येणार आहे. सदर क्लासेसच्या उद्घाटन कार्यक्रमात अध्यक्ष स्थानी मा. श्री. राजेश सोलापन जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघ चंद्रपूर होते. तर उद्घाटक म्हणून मा. डॉ. मंगेशजी गुलवाडे अध्यक्ष भाजपा महानगर चंद्रपूर हे होते. सदर कार्यक्रमाला प्रकाशजी धारणे, नगर सेवक सुभाषभाऊ कासनगोट्टूवार, धनराज कोवे,अनिल देठे संपादक विदर्भ समाचार, नगरसेविका सौ. चंद्रकलाताई सोयाम, सौ. वंदनाताई जांभुळकर, कृष्णाजी मसराम, युवराज वरखडे सर, डॉ. वैभव पोडचर्लावार, डॉ. राकेश वनकर, डॉ. पंकज कुळसंगे, अॅड. भैय्याजी उईके, शिक्षिका श्रीमती वरभे मॅडम, भोला मडावी, गंगाधर कुंटावार, समीर शेख, पप्पु बोपचे, दिनकरजी सोमलकर, यशवंत सिडाम, डॉ. दिपक भट्टाचार्य, सौ. रेखा मडावी, सो. निलीमा आत्राम यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. उद्घाटनीय भाषणात बोलतांना डॉ. मंगेश गुलवाडे यांनी म्हटलं की, असा नाविण्यपूर्ण उपक्रम अजून पर्यंत राबविण्यात आलेला नाही. जे १००० विद्यार्थी वर्षभर धनराज कोवे मित्र परिवाराचे माध्यमातून इंग्लिश स्पोकन क्लासेस करतील. म्हणजे ३६५ दिवस छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना अर्पित केल्या सारखे होईल. धनराज कोवे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, सहकारी मित्र परिवाराची साथ मिळाल्याने हा उपक्रम राबविणे शक्य होत आहे. लोक सहभागातून जन कल्याण या धर्तीवर इंग्लिश स्पोकन कोर्स हा मोफत १००० विद्यार्थ्यांना देणे शक्य होत आहे. करीता या उपक्रमाला सहकार्य करणारे महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघ चंद्रपुर केअर पॉली क्लिनीक अॅन्ड रिसर्च सेंटर, राधेक्रिष्ण सेवा सहकारी संस्था, गरुदेव सेवा मंडळ, विदर्भ चंद्रपूर केबल नेटवर्क, बाहु बाल गणेश मंडळ, ग्रामीण भारत महिला गृह उद्योग मंडळ, ख्वाजा फकरुद्दीन अब्दाल चि. कमेटी, बाबाभाई मित्र परिवा, जय आझाद हिंद स्पोटींग क्लब, चंद्रपूर इत्यादी सहकारी मित्र परीवाराचे सहकार्य मिळाल्याने शक्य होत आहे. पुढे नगरसेवक सुभाषभाऊ कासनगोट्टूवार यांनी म्हटले की, असे कोर्सेस प्रत्येक प्रभागामध्ये झाल्यास गरीब मुलांचे भविष्य उज्वल होणे शक्य आहे शेवटी अध्यक्षीय भाषणात राजेश सोलापन यांनी सांगितले की, मी अनेक कार्यकामध्ये गेला मात्र असा स्तृत्य उपक्रम सामाजीक बांधिलकी जोपासत लोक सहभागातुन जन कल्याण होत असल्याचा आनंद होत आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात इंग्रजी भाषा ही जागतीक भाषा असल्याने शिकणे ही काळाची गरज आहे तेव्हा धनराज कोवे यांच्या पुढाकाराने व ज्ञानमंथन कोचिंग क्लासेसच्या सहकार्याने गरिव विद्यार्थ्यांना इंग्लिश स्पोकन क्लास करणे शक्य होत आहे. करिता त्यांचे हार्दिक अभिनंदन सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रजनी पुसे मॅडम, वैष्णवी नवघरे मॅडम, गणेश लांडे, अजय जाधव, मुकेश देवांगण, साहिल बावणे, आदित्य बेरागडे, रितीक वाढई, रामटेके, लक्की कोवे, पुत्रम माहिनकर, अंकिता आवेकर, परि वाकडे, खुशी झाडे, सौदर्या झाडे यांनी अथक परिश्रम घेतले.
प्रति,
मा. संपादक / वार्ताहर
दैनिक/साप्ताहिक
सदर वृत्त आपले लोकप्रिय दैनिकातून प्रकाशित करुन आम्हास उपकृत करावे ही विनंती,