एसटी कामगारांना ध्वजारोहणापासून ठेवले आगार व्यवस्थापकाने वंचित
आगार व्यवस्थापकाविरोधात कर्मचाऱ्यांनी केले अवधूतवाडी पोलीस स्टेशनला तक्रार
X
यवतमाळ दि.२६ जानेवारी -:मागील ९० दिवसापासून राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा लढा विलगीकरणाचा दुखवटा शांततेच्या मार्गाने हा दुखवटा सुरु आहे.
आज दि २६ जानेवारी २०२२ रोजी प्रजासत्ताक दिना निमित्य यवतमाळ आगारात ध्वजारोहणसाठी दुखवट्यातील कर्मचारी गेले असता त्यांना सुरक्षा रक्षकाने आतमध्ये येण्यास मज्जाव केला व जाब विचारला असता आगार व्यवस्थापकाचे (वरिष्ठ) यांचे मनाई हुकुम वरुन आत मध्ये दुखवट्यातील कर्मचाऱ्यांस ध्वजारोहणास उपस्थित राहण्यास मनाई केली आहे असे सांगितले.
त्यामुळे या कर्मचाऱ्यांना हेतूपुरस्पर ध्वजारोहणास पासून वंचित ठेवले असून ध्वजारोणापासून वंचित ठेवणे हा त्यांच्या संविधानिक अधिकारांपासून वंचित ठेवल्याने हा एक प्रकारे देशद्रोहच आहे.प्रत्येक भारतीयाला आपल्या देशाबद्दल अभिमान असून त्यांना राष्ट्रीय सणापासून किंवा ध्वजारोहण यापासून कोणीही वंचित ठेवू शकत नाही मात्र आगार व्यवस्थापकाने कर्मचाऱ्यांना वंचित ठेवून एक प्रकारे संविधानाचा अपमान केला आहे.यामुळे या संबंधित अधिकाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी अवधूतवाडी पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून कर्मचाऱ्यांनी केली आहे.