Home > Latest news > हिंदू स्मशानभूमी ते किरण पेट्रोल पंप सिमेंट रोडवर हाय माक्स लाईटचे लावा मागणी

हिंदू स्मशानभूमी ते किरण पेट्रोल पंप सिमेंट रोडवर हाय माक्स लाईटचे लावा मागणी

Demand for High Max Light on Cement Road from Hindu Cemetery to Kiran Petrol Pump

हिंदू स्मशानभूमी ते किरण पेट्रोल पंप सिमेंट रोडवर हाय माक्स लाईटचे लावा मागणी
X

यवतमाळ प्रतिनिधी

मागील अनेक दिवसापासून बस स्थानक चौकापासून तर पांढरकवडा बायपास रोड पर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम मोठ्या प्रमाणावर सुरु असून शहरातील शारदा चौक ते किरण पेट्रोल पंप या दरम्यान डीवाईडर मध्ये लाईटची व्यवस्था सार्वजनिक बांधकाम विभागाने केली नसल्याची माहिती मिळताच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे चिटणीस जावेद परवेज अन्सारी यांनी आपल्या सहकारी मित्र व नागरिकांसोबत सोबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता प्रवीण कुलकर्णी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले याबाबत सविस्तर वृत्त असे की शारदा चौक ते किरण पेट्रोल पंप दरम्यान मोठ्या प्रमाणावर रहदारी असून महिला पुरुष नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर आवागमन होत असते मागील पंधरा दिवसापूर्वी इंदिरानगर मधील रहिवासी मोहम्मद इरफान यांचे अपघाती निधन झाले होते या रस्त्यावरील डिव्हायडर मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणामुळे विद्युत रोशनाई ची व्यवस्था करण्यात आली नव्हती ही बाब लक्षात येताच या परिसरातील ज्येष्ठ नगरसेवक जावेद परवेज अन्सारी ज्यांनी कार्यकारी अभियंता प्रवीण कुलकर्णी यांची भेट घेऊन या परिसरात म्हणजेच हिंदू स्मशानभूमी ते किरण पेट्रोल पंप पर्यंत तीन हाय मास लाईट लावण्याची मागणी केली या मागणीला समर्थन करीत कुलकर्णी साहेबांनी या दृष्टिकोनातून प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याचे अभिवचन शिष्टमंडळाला दिले व या जागेवर हाय Maskलाईट लावण्यात येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करून ही समस्या सोडविण्याचे अभिवचन शिष्टमंडळाला दिले याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे चिटणीस जावेद परवेज अन्सारी यांच्यासोबत हाजी अब्दुल जाकिर साहब जाहीर काजी साहब जावेद अख्तर जुल्फिकार अहमद अफसर मिर्झा साजिद पेंटर वसीम मवाल आरिफ खान जब्बर पटेल अहमदशहा शकील मिस्त्रीरिजवान भाई आदी सह मोठ्या संख्येने परिसरातील कार्यकर्ते उपस्थित होते

Updated : 23 Feb 2022 6:47 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top