Home > Latest news > कर भरण्यास नकार देणाऱ्याविरुद्ध मनपाची जप्ती कारवाई शास्त्रीनगर येथे थकीत कर भरल्याने सील उघडले

कर भरण्यास नकार देणाऱ्याविरुद्ध मनपाची जप्ती कारवाई शास्त्रीनगर येथे थकीत कर भरल्याने सील उघडले

Corporation confiscation action against those who refuse to pay taxes The seal was opened at Shastrinnagar due to arrears of tax

कर भरण्यास नकार देणाऱ्याविरुद्ध मनपाची जप्ती कारवाई    शास्त्रीनगर येथे थकीत कर भरल्याने सील उघडले
X

आरती आगलावे

चंद्रपुर तालुका प्रतिनिधि


चंद्रपूर, ता. २२ : चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून कर वसुलीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. तसेच वारंवार सूचना देऊनही कर न भरणाऱ्या आणि टाळाटाळ करणाऱ्या दुकानदारांचे गाळे सील करण्याची कारवाई सुरू आहे. दि. २२ फेब्रुवारीला मनपाच्या कर वसुली व जप्ती पथकाने झोन क्रमांक ३ भागात मालमत्ता कर व अन्य करांची थकबाकी असलेल्या आणि कर भरण्यास नकार देणाऱ्या मालमत्ता धारकाविरुद्ध जप्ती कारवाई करण्यात आली. दरम्यान, शास्त्रीनगर येथे थकीत कर भरल्याने सील उघडण्यात आले.

झोन क्र.३ येथील मालमत्ताधारकाने २०२१ ते २२ या वर्षातील दुकानाचा मालमत्ता कर, इतर कर भरण्यास टाळाटाळ केली. आज मंगळवारी, दि. २२ फेब्रुवारी रोजी जप्ती पथकाद्वारे जप्ती कार्यवाही करण्यात आली. झोन क्र. ३ शास्त्रीनगर वॉर्ड येथील मा. क्र. ३A/१२२८/९ या कमर्शियल दुकानाचा मालमत्ता कर व इतर कर थकीत होता. १८ फेब्रुवारीला जप्ती पथकाद्वारे दुकानाला सील करण्यात आलेले होते. सदर दुकानदाराने आज दिनांक २२ फेब्रुवारी रोजी मालमत्ता कर व इतर कराचा ₹ १५४५४/- रकमेचा भरणा केलेला असून, सदरील दुकानाचा सिल उघडण्यात आलेले आहे. ही कारवाई सहायक आयुक्तांच्या नेतृत्वात करण्यात आली.

Updated : 23 Feb 2022 1:35 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top