Home > Latest news > आ. मुनगंटीवारांच्या उपस्थितीत शिवरायांना मानवंदना महानगर भाजपाचा उपक्रम.

आ. मुनगंटीवारांच्या उपस्थितीत शिवरायांना मानवंदना महानगर भाजपाचा उपक्रम.

Come on. Salute to Shivaraya in the presence of Mungantiwars Mahanagar BJP's initiative.

आ. मुनगंटीवारांच्या उपस्थितीत शिवरायांना मानवंदना    महानगर भाजपाचा उपक्रम.
X


भारतीय जनता पार्टी,चंद्रपूर महानगर तर्फे पटेल हायस्कुल समोरील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शनिवार(19 फेब्रुवारीला) ला 'शिवजयंती निमित्य हिंदवी स्वराज्याचे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विधिमंडळ लोकलेखा समितीचे अध्यक्ष तथा माजी अर्थमंत्री आ.सुधीर मुनगंटीवार यांची उपस्थिती राहणार आहे.

भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे यांच्या नेतृत्वातील या कार्यक्रमात भाजपा महानगर संघटन मंत्री राजेंद्र गांधी,महासचिव सुभाष कासनगोट्टूवार,रवींद्र गुरनुले,ब्रिजभूषण पाझारे,कोषाध्यक्ष प्रकाश धारणे,महापौर राखी कंचर्लावार,उपमहापौर राहुल पावडे,स्थायी समिती सभापती संदीप आवारी,महिला मोर्चा अध्यक्ष अंजली घोटेकर, भाजयुमो जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर यांचेसह भाजपा नगरसेवक,नगरसेविकायांची प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे.

यावेळी ढोलताश्याच्या गजरात आ.मुनगंटीवार यांचे हस्ते भव्य भगवा ध्वज,(हिंदवी स्वराज्याची पताका ) फडकविण्यात येणार आहे.या कार्यक्रमाला भाजपा पदाधिकारी,कार्यकर्ते व शिवप्रेमी नगरिकांनी मोठ्यासंख्येने उपस्थित रहावे,असे आवाहन महानगर भाजपा तर्फे करण्यात आले आहे.

Updated : 18 Feb 2022 1:25 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top