Home > Latest news > गेल्या अनेक वर्षापासून अस्वच्छतेच्या विळख्यात असलेल्या कुरेशीपूरा भागात मुख्याधिकारी माधुरी मडावी यांच्या पुढाकाराने स्वच्छता अभियान राबविल्याने येथील नागरिकांनी केला आनंद व्यक्त

गेल्या अनेक वर्षापासून अस्वच्छतेच्या विळख्यात असलेल्या कुरेशीपूरा भागात मुख्याधिकारी माधुरी मडावी यांच्या पुढाकाराने स्वच्छता अभियान राबविल्याने येथील नागरिकांनी केला आनंद व्यक्त

Citizens of Qureshipura area, which has been suffering from unsanitary conditions for the last several years, expressed happiness over the initiative of Chief Minister Madhuri Madavi.

गेल्या अनेक वर्षापासून अस्वच्छतेच्या विळख्यात असलेल्या कुरेशीपूरा भागात मुख्याधिकारी माधुरी मडावी यांच्या पुढाकाराने स्वच्छता अभियान राबविल्याने येथील नागरिकांनी केला आनंद व्यक्त
X

यवतमाळ (वासीक शेख): गेल्या अनेक वर्षापासून सरकारच्या वतीने संपूर्ण देशात स्वच्छता अभियान राबविल्या जात आहे परंतु यवतमाळ येथील प्रभाग क्रमांक नऊ मधील मुस्लिम अल्पसंख्याक बहुल क्षेत्र असलेले कुरेशीपूरा भागातले नागरिक अनेक वर्षापासून सांडपाण्याची आणि अस्वच्छतेची समस्यांपासून त्रस्त होते या भागात कित्येक नगरसेवक निवडून आले परंतु एकानेही या समस्यावर तोडगा काढला नाही यवतमाळ नगरपालिकेवर प्रशासकीय अधिकारी म्हणून माधुरी मडावी मॅडम हे रुजू झाले तेव्हापासून शहरात अनेक भागात स्वच्छतेची मोहीम जोराने सुरू करण्यात आली आहे.

या मोहिमेचा एक भाग म्हणून यवतमाळ शहरातील मुस्लिम अल्पसंख्याक बहुल क्षेत्र असलेले कुरेशीपूरा भागात शुक्रवार दिनांक 28 जानेवारी 2022 रोजी मुख्याधिकारी माधुरी मडावी मॅडम यांच्या नेतृत्वात या भागात स्वच्छता अभियान राबविण्यात आला यातूनच या भागामध्ये सांडपाण्याची समस्या मोठ्या प्रमाणे होती या समस्या वर तोडगा काढून येथील चोकप झालेले नाल्यांना फायर ब्रिगेड च्या साह्याने साफ करण्यात आले.

हे सगळे कार्य पाहून आमच्या प्रतिनिधीने तेथील काही नागरिकांशी संवाद साधला असताना त्यांनी सांगितले की हे भाग अनेक वर्षापासून या समस्यांपासून ग्रस्त होता व इतक्या वर्षात एकही नगरसेवकांनी या समस्यावर तोडगा काढला नाही आज मुख्याधिकारी माधुरी मडावी मॅडम यांनी ही स्वच्छता मोहीम राबवून येथील नागरिकांचे आरोग्याचे रक्षण केले त्याबद्दल आम्ही सर्व त्यांना धन्यवाद देत आहोत.

Updated : 28 Jan 2022 6:32 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top