Home > Latest news > मंगरुळपीर तालुक्यातील इचोरीत रोखला मुलीचा बालविवाह

मंगरुळपीर तालुक्यातील इचोरीत रोखला मुलीचा बालविवाह

Child marriage stopped in Echori in Mangrulpeer taluka

मंगरुळपीर तालुक्यातील इचोरीत रोखला मुलीचा बालविवाह
X

फुलचंद भगत

वाशिम:- मंगरूळपीर तालुक्यातील इचोरी येथे एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावून देण्यात येणार असल्याची गुप्त माहिती चाइल्ड लाइनच्या टोल फ्री क्रमांक १०९८ वर मिळाली.त्यावरून जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आलोक अग्रहरी यांनी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांना तात्काळ घटनास्थळी जाऊन बालविवाह थांबविण्याचे निर्देश दिले.

जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे कायदा तथा परीविक्षा अधिकारी जिनसाजी चौधरी,तालुका संरक्षण अधिकारी धीरज उचित,चाइल्ड लाइनचे केस वर्कर अविनाश चौधरी,पोलीस विभागाचे श्याम शिंदे,गणेश गर्दै यांनी इचोरी येथे जाऊन ग्राम बाल समिती सोबत चर्चा करून बालिकेच्या घरी जाऊन समुपदेशन करून बालविवाह रोखला.

१८ वर्षे पूर्ण झाल्यावरच आता मुलीचे लग्न करणार असल्याचे हमीपत्र मुलीच्या पालकांकडून लिहून घेण्यात आले.

जिल्ह्यात अशा प्रकारचे बालविवाह जर कुठे होत असतील तर ते रोखण्यासाठी चाइल्ड लाइनच्या १०९८ या टोल फ्री नंबरवर संपर्क साधावा.माहिती देणा-याचे नाव गुप्त ठेवले जाईल.असे आवाहन प्रभारी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आलोक अग्रहरी यांनी केले आहे.

Updated : 17 Feb 2022 6:24 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top