छत्रपती शिवाजी महाराज सर्व जाती,धर्माच्या ऱयतेचे राजे:प्रा.सय्यद सलमान
Chhatrapati Shivaji Maharaj Kings of all castes and religions: Prof. Syed Salman
X
पुसद, दिनांक 19 फेब्रुवारी रोजी निरंजन राठोड सरांच्या श्रीदत्तसेवा ऍकॅडमी मध्ये शिवजयंतीच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महारांच्या व्याख्यांनाचा कार्यक्रम आयोजित करण्यार आला होता.ज्यामध्ये प्रमुख पाहुणे व वक्ता म्हणून पुसद येथील पि.एच.डी स्कॉलर आणि शिक्षा स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक व शिवचरित्र अभ्यासक प्रा.सय्यद सलमान शेरू सरांच व्याख्यान आयोजित करण्यात आला होता ज्या मध्ये प्रा.सय्यद सलमान सरांनी छत्रपति शिवरायांच चरित्र आणि आजचा युवक या विषयावर पर प्रकाश टाकून आजच्या सर्व तरुणांना शिवरायांसारख चरित्रशील होण्याचा अहवान केलं.सोबतच छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची धर्म सहिष्णु व्यवस्था सांगितली व आपल्या रयतेच्या राज्यातील मुस्लिम सैनिकांची भूमिका सुद्धा सांगितली की , शिवाजी महाराजांच राज्य कोण्या एका धर्माचा किंव्हा विशिष्ट समाजाचा नसुन सर्व धर्माच्या जातीच्या लोकांसाठी रयतेच राज्य होतं शिवरायाचा लढा हा तात्कालीन राजकिय होता जो की अन्याय आणि विषमतेच्या विरुद्ध स्वराज्याचा होता आणि जर आज आपला युवक शिवाजी महाराजांचा चरित्र वाचुन उभा राहिला तर नक्कीच तो न्याय,समतेच,सर्व समाजाच्या कल्याणच्या रयतेच राज्य निर्माण होऊ शकतो. आणि आज सुद्धा जीवाला जीव देणारे मुस्लिम मावळे साथ देतील.आणि शिवाजी महाराजांच्या विचाराचं राज्य ज्या मध्ये कोणत्याच प्रकारच द्वेष,जातिवाद, धर्मवाद, विषमता नसणारे एक रयतेच राज्य निर्माण होऊ शकते अश्या प्रकारे प्रा.सय्यद सलमान सरांनी मराठी भाषेत विद्यार्थ्यांपुढे एक वैचारिक भाषणं देऊन शिवाजी महाराजांचा वास्तविक इतिहास आणि चरित्र ठेवले तसेच एक मुस्लिम शिवचरित्र अभ्यासक छत्रपती शिवाजी महाराजांवर एवढ विस्तृत आणि गाढा अभ्यास करून बोलतो हे पाहून विद्यार्थी खूप मंत्रमुग्ध झाले सोबत काही गुणवंत विद्यार्थ्यांच सत्काराचा कार्यक्रम सुद्धा प्रा.सलमान सरांच्या हस्ते पार पडला या आभार व्यक्त केले तसेच शिवाजी महाराजांवर लिखित पुस्तक कुरआनचा आदर करणारे शिवराय हे पुस्तक श्री दत्त सेवा अकॅडमी चे संचालक निरंजन राठोड सर यांना भेट दिले या कार्यक्रमाचे सूत्र संचालन निरंजन सर यांनी केले कार्यक्रमचा समारोप पृथ्वीराज सरांनी केले तसेच या कार्यक्रमामध्ये प्रा.सलमान सर सोबत जहिर पटेल भाई सुद्धा उपस्थित होते.अश्या प्रकारे शिवचरित्राच्या प्रबोधनाचा कार्यक्रम निरंजन राठोड सरांच्या श्रीदत्तसेवा अकॅडमी येथे संपन्न झाला.