Home > Latest news > दातिवरे हायस्कूल मध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

दातिवरे हायस्कूल मध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

Celebrate Republic Day at Dativare High School

दातिवरे हायस्कूल मध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
X



वैभव पाटील

पालघर प्रतिनिधी

पालघर तालुक्यातील दातिवरे शिक्षण संस्थेच्या दातिवरे हायस्कूल मध्ये कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करून ७३ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.सकाळी ठीक 8:30 वाजता सन्मान संस्थेचे कार्यवाह प्रशांत ठाकुर यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सदर प्रसंगी दातिवरे हायस्कूल चे माजी विद्यार्थांनी 2002च्या एस.एस.सी.बॅच ने आपल्या शाळेच्या प्रेमापोटी झेरॉक्स प्रिंटर व स्कॅनर (थ्री इन वन) भेट म्हणुन शाळेचे मुख्याध्यापक ए.सी.राठोड सर व मान्यवर यांच्या कडे संपूर्ण सेट सुपुर्द करण्यात आला . म्हणतात ना देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे याच उक्ती प्रमाणे ऋण फेडण्याचा काम 2002 च्या बॅच ने केले . आपण या शाळेचे, समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतूनच माजी विद्यार्थ्याने शाळेला भेट वस्तू देण्याची योजना तयार केली. संस्थेचे कार्यवाह प्रशांत ठाकुर यांनी माजी विद्यार्थांनी केलेल्या दानाबाबत भरभरुन कौतुक केले.मुख्याध्यापक राठोड सर यांनी माजी विद्यार्थांनी दाखवलेल्या दानीवृत्ती बद्दल संस्थेच्या व शाळेच्या वतीने माजी विद्यार्थांना भरभरून शुभाशीर्वाद दिले.आज कोरोना काल असतानाही माजी विद्यार्थांनी केलेल्या हा दानाबद्दल व शाळेबद्दल असणार्‍या आपुलकी व प्रेमाबाबत परिसरात सर्वच स्तरावरून S.S.C 2002 च्या बॅच चे कौतुक होत आहे. असेच दातिवरे हायस्कूल च्या सर्व माजी विद्यार्थांनी आपल्या , शाळेबद्दल आपुलकी दाखऊन आपले उत्तम कर्तृत्व पार पाडावे असे आवाहन केले .सदर छोटेखानी कार्यक्रमासाठी शालेय समिती अध्यक्ष हेमंत ठाकुर व त्यांच्या सौभाग्यवती ठाकुर मॅडम उपस्थित होत्या.तसेच संस्थेचे सहसचिव राजेश चुरी, गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ व शाळेतील शिक्षक वृंद उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुशिल यांनी सर यांनी केले.

Updated : 27 Jan 2022 8:20 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top