Home > Latest news > आता हृदय रुग्णांच्या मदतीला धावून येणार जीवनावश्यक उपकरणरयुक्त कार्डियाक अँब्युलन्स

आता हृदय रुग्णांच्या मदतीला धावून येणार जीवनावश्यक उपकरणरयुक्त कार्डियाक अँब्युलन्स

पीडीएमसी रुग्णालयातील कार्डियाक अँब्युलन्सचे आ. सुलभाताई खोडके यांच्या हस्ते लोकार्पण

आता हृदय रुग्णांच्या मदतीला धावून येणार जीवनावश्यक उपकरणरयुक्त कार्डियाक अँब्युलन्स
X

आता हृदय रुग्णांच्या मदतीला धावून येणार जीवनावश्यक उपकरणरयुक्त कार्डियाक अँब्युलन्स

पीडीएमसी रुग्णालयातील कार्डियाक अँब्युलन्सचे आ. सुलभाताई खोडके यांच्या हस्ते लोकार्पण

आमदार स्थानिक विकासाच्या ३९ लक्ष निधीतून कार्डियाक अँब्युलन्स रुग्णसेवेत कार्यान्वित

अमरावती ०३ फेब्रुवारी : आजच्या धावपळीच्या युगामध्ये नागरिकांची जीवनशैली देखील बदलत चालली आहे. बदलत्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर जाणवत असून यामधून हृदयाघात होण्याचे प्रमाणही वाढले असून , हृदय रुग्णांना वेळेवर प्राथमिक उपचार न मिळाल्याने अनेक हृदय रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे आता हृदयघात झाल्यास रुग्णांवर प्राथमिक उपचार करून हॉस्पिटल पर्यंत तत्परतेने पोहोचविण्याची जीवनावश्यक उपकरणरयुक्त कार्डियाक अँब्युलन्स धावून येणार आहे. यातून निश्तितच हृदयघाताचे लवकर निदान होऊन रुग्णांना तत्पर सेवा मिळणार असून आरोग्य यंत्रणेला देखील बळकटी व संजीवनी मिळणार असल्याचा विश्वास आ. सौ सुलभाताई खोडके यांनी व्यक्त केला .

अमरावतीच्या आ. सौ. सुलभाताई खोडके यांच्या आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत ३९ लक्ष इतक्या अनुदानातून डॉ पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय अमरावतीला प्राप्त सर्वसोयींयुक्त जीवनावश्यक उपकरणांनी परिपूर्ण अशा कार्डियाक रुग्णवाहिकेच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी त्या बोलत होत्या . गुरुवार दिनांक ०३ फेब्रुवारी २०२२ रोजी पीडीएमसी रुग्णालयाच्या गायटॉन हॉल मध्ये श्री. शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या लोकार्पण सोहळ्या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अमरावती विभागीय समन्वयक संजय खोडके, संस्थेचे उपाध्यक्ष डॉ . रामचंद्रजी शेळके , कोषाध्यक्ष दिलीपबाबू इंगोले , तसेच संचालक डॉ . पद्माकर सोमवंशी , पीडीएमसीचे अधिष्ठाता डॉ. अनिल देशमुख , आदी मान्यवर उपस्थित होते . याप्रसंगी रुग्णवाहिकेचे पूजन व फीत कापुन आ. सौ. सुलभाताई खोडके यांनी लोकार्पणाची औपचारिकता साधली . या जीवनावश्यक उपकरणरयुक्त कार्डियाक अँब्युलन्स मध्ये व्हेंटिलेटर , ओक्सी मीटर , ऑक्सिजन स्टोरेज , मॉनिटर,एन्फ़ुजन् पंप , बॅटरी बॅकअप , मिनी रेफ्रिजरेटर , व्हील चेअर . दोन स्ट्रेचर आदी जीवनरक्षक उपकरणांचा समावेश आहे. याप्रसंगी शिवपरिवाराच्या वतीने आ. सौ . सुलभाताई खोडके यांचे पुष्पगुच्छ व पुस्तक भेट देऊन स्वागत करण्यात आले . समारंभा दरम्यान पुढे बोलतांना आ. सौ . सुलभाताई खोडके म्हणाल्या की , सद्या कोविड महामारीचा काळ सुरु असल्याने यावर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्यातील महाविकास आघाडी सरकारने दीर्घकालीन उपाययोजनांची मालिकाच राबविली आहे. अद्द्यावत व प्रगत आरोग्य सुविधेचा अमरावतीकरांनाही लाभ मिळावा , तसेच आरोग्य यंत्रणेला बळकटी मिळून रुग्णांना आरोग्य संजीवनी बहाल व्हावी, यासाठी आपले सातत्यपूर्ण प्रयत्न सुरु आहे. अमरावतीमध्ये जीवनावश्यक उपकरणरयुक्त कार्डियाक अँब्युलन्स कार्यान्वित झाल्याने हृदय रुग्णांना वेळेवर प्राथमिक उपचाराची सोय होऊन त्यांचे प्राण वाचावीता येणार असल्याचे मनोगत सुद्धा आमदार महोदयांनी याप्रसंगी व्यक्त केले . आगामी काळात रुग्णांच्या नातेवाईकांकरिता निवासी व्यवस्था करण्यासाठी आपण प्रयत्नरत आहोत , त्याकरिता संस्थेच्या वतीने आवश्यक बाबींची पूर्तता करण्याला घेऊन त्यांनी यावेळी संस्थाध्यक्ष व संचालक मंडळ व पीडीएमसी व्यवस्थापनाचे लक्ष वेधले . संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात पीडीएमसीतील आरोग्य सेवांबाबत माहिती विशद करीत कोविड काळातही पीडीएमसी रुग्णालयाने उल्लेखनीय रुग्णसेवा दिली असल्याचे सांगितले . तसेच खोडके दाम्पत्यांच्या वतीने वेळोवेळी लाभणारे सहकार्य हे अविस्मरणीय ठरू पाहत असल्याचे त्यांनी सांगितले . या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी संस्थेचे आजीवन सदस्य ऍड . राजाभाऊ गिरनाळे , पीडीएमसीतील डॉ .कृष्णा विल्हेकर, डॉ. वसंत लुंगे, डॉ. गजानन पुंडकर, डॉ. रामावतार सोनी, डॉ. शैलेश बारब्दे, डॉ. किशोर बनसोड, डॉ. खंडेलवाल, डॉ. पी. पी. तोरकरी , डॉ. व्ही. आर. वासनिक, डॉ. मिलिंद जगताप, डॉ. अनंत काळबांडे तसेच शिवाजी शिक्षण संस्थेतील प्राचार्य डॉ . स्मिता देशमुख , प्रा. दिपाली भारसाकळे , प्रा.डॉ . शशांक देशमुख, वैशाली गुल्हाने, त्याचबरोबर नगरसेवक प्रशांत डवरे , डॉ वसंत लुंगे, जिल्हा रक्तदान समितीचे अध्यक्ष महेंद्र भुतडा , यश खोडके, ममता आवारे , अजय दातेराव, प्रमोद महल्ले, योगेश सवई, अण्णा बागल, बंडू धोटे, जितू भाऊ ठाकुर, प्रशांत पेठे, अभिषेक हजारे, संदीप आवारे, अजय कोळपकर, शक्ती तिडके, आकाश वडनेरकर, महेश साहू, बाळू नागे, बंडू निंभोरकर, सुयोग तायडे, चेतन वाठोडकर, शिवपाल ठाकूर , रत्नदीप बागडे, निलेश शर्मा, गुड्डू धर्माळे , प्रा . भालचंद्र मावळे , महेंद्र सोमवंशी , मनोज केवले, ममता आवारे, पियुष मोरे, अभिजीत धुरजळ, अक्षय पळसकर, संदीप गावंडे, अशोक हजारे, सुनील रायटे , दिनेश देशमुख ,प्रमोद सांगोले , दीपक कोरपे , राजेश कोरडे, किशोर भोयर, मनोज केवले, प्रा . डॉ . अजय बोन्डे , दत्तात्रय बागल , प्रवीण भोरे ,श्रीकांत झंवर , माजी नगरसेवक प्रवीण मेश्राम , विजय बाभुळकर , रामदास इमले , नाना पानसरे , पंकज थोरात , प्रा. संजय वाटणे, संजय बोबडे, किशोर देशमुख, अमोल वानखडे, किशोर चव्हाण, के. एम. अहमद, प्रवीण भोरे, राजेंद्र टाके, केशव वानखडे, बाबासाहेब देशमुख, प्रमोद इंगळे, मुरलीधर साखरकर, गुलाबराव राठोड, पि.डी बिडकर, रविदास नथुजी, मोहनदास मते. किशोर देशमुख, आदींसह निमंत्रित मान्यवर , शिवपरिवारातील सदस्य तसेच आरोग्य कर्मचारी व नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते . कार्यक्रमाचे प्रास्ताविक पीडीएमसीचे अधिष्ठाता डॉ . अनिल देशमुख यांनी केले . तर संचालन किशोर इंगळे व आभार डॉ रामावतार सोनी यांनी मानले .

Updated : 4 Feb 2022 6:14 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top