Home > Latest news > जामठी फाट्या जवळ ट्रक व दुचाकीच्या अपघातात दोघे ठार

जामठी फाट्या जवळ ट्रक व दुचाकीच्या अपघातात दोघे ठार

Both were killed in a truck and two-wheeler accident near Jamthi Fateh

जामठी फाट्या जवळ ट्रक व दुचाकीच्या अपघातात दोघे ठार
Xअकोला / मूर्तिजापूर प्रतिनिधी

मिलींद जामनिक - 9850599025


मूर्तिजापूर - राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील माना पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या जामठी फाट्याजवळ ट्रक व मोटरसायकल अपघातात दोन जण ठार झाल्याची घटना मंगळवारी सकाळी १०:३० वाजता च्या दरम्यान घडली. अमरावती वरून आपल्याकडे असलेला ट्रक क्रमांक सी जी ०४ एन सी ५०९९ ने दुचाकी क्रमांक एमएच ३० बी एम ४०९७ ला समोरून जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार संतोष रमेश शिंदे वय ३५ वर्ष,प्रकाश गंगाराम जाधव वय ३७ वर्ष राहणार मासा (सिसा)बोरगाव हे दोघेही ठार झाले.एक जण घटनास्थळी ठार झाला तर दुसरा उपचारादरम्यान मृत्यू झाला.व पुढील तपास माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार संजय खंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली माना पोलीस करीत आहे.

Updated : 22 Jun 2021 2:39 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top