तायक्वॉदो फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने तायक्वॉदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र तर्फे रत्नागिरी येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे ब्लेक बेल्ट (दान) व राष्टीय रेफरी परीक्षा पार पडली.
Black Belt (Dan) and National Referee Exams were conducted by Taekwondo Association of Maharashtra at Chhatrapati Shivaji Maharaj Sports Complex, Ratnagiri with the approval of Taekwondo Federation of India.
X
परीक्षेत राज्यातील 1100 खेळाडूंनी उत्तम प्रतिसाद दिला.त्यात 800 ब्लॅक बेल्ट व दान तर 300 राष्टीय पंच/रेफरी साठी सहभाग नोंदऊन उत्तम प्रतिसाथ दिला ,या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्याहस्ते उद्घाटन करून उत्साहात प्रारंभ झाला.
यावेळी तायक्वाँदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे, महासचिव मिलिंद पठारे, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते प्रवीण बोरसे, रत्नागिरी तायक्वांदो असोसिएशनचे अध्यक्ष व राज्यसंघटना व्यंकटेशवर कररा,तसेच राज्य संघटनेचे सदस्य व चंद्रपुर जिल्ह्या तायक्वांदो संघटना चे महासचिव सतीश खेमस्कर, आदी उपस्थित होते
या परीक्षेत चंद्रपुर जिल्ह्यातील आपला सहभाग नोंदवत उत्तम श्रेणी संपादन केली त्यात चंद्रपुर जिल्ह्यातील प्रशिक्षक नवनीत मून व रितेश पठाडे यांना ब्लॅक बेल्ट 1 दान यांची परीक्षा देऊन यात ते यशस्वी झाले
तसेच राष्टीय रेफरी परीक्षा व रिफ्रेशर कोर्स श्री नवीन चंद्रा सर(आंतरराष्ट्रीय रेफरी)यांच्या मार्गदर्शन व निरीक्षणाखाली घेण्यात आली या 4 दिवस झालेल्या परीक्षेत चंद्रपुर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील प्रशिक्षक तुषार दुर्गे यांनी रिफ्रेशर परीक्षा दुसऱ्यांदा पास केली तर चंद्रपुर तालुक्यातील प्रशिक्षक नवनीत मून,रितेश पथाडे,वरोरा तालुक्यातील सचिन बोढाने यांनी परीक्षा पास करीत राष्टीय रेफरी म्हणून नियुक्त झालेत ,यांना चंद्रपुर जिल्ह्यातील महासचिव सतीश खेमस्कर सर यांचे मार्गदर्शन लाभले.
या खेळाडूंनी परीक्षेमध्ये पूमसे क्यूरोगी, ब्रेकींग, सेल्फ डिफेन्स फिटनेस टेस्ट पार पाडल्या. आणि राष्ट्रीय रेफरी बद्दल संपूर्ण माहिती सह प्रात्यक्षिक करत परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केले..
या सर्वांचे तायक्वांदो असोसिएशन ऑफ चंद्रपुर डिस्ट्रिक्ट तर्फे कौतुक करण्यात येत आहे