भाजपा कार्यकर्त्यांनी समजून घेतली आत्मनिर्भर अर्थव्यवस्था पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले संबोधन.
BJP workers understand self-reliant economy Address by Prime Minister Narendra Modi.


केंद्रीय वित्तमंत्री सीतारमण यांनी 1 फरवरीला 2022-2023 या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प देशात आत्मनिर्भर अर्थव्यवस्था उभारण्यासाठी कशी महत्वपूर्ण भूमिका बजावणार आहे? याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातवरून देशातील भाजपा कार्यकर्त्यांना लाईव्ह मागर्दशन केले. चंद्रपूर येथे माजी अर्थमंत्री तथा विधिमंडळ लोकलेखा समिती अध्यक्ष आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात आय.एम.ए. सभागृहात भाजपा महानगर, आत्मनिर्भर आघाडी तर्फे बुधवार स.11 (2 फरवरीला) थेट प्रसारणाचा कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा संघटन महामंत्री राजेंद्र गांधी यांची तर उद्घाटक म्हणून भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांची उपस्थिती होती. प्रमुख अतिथी म्हणून उपमहापौर राहुल पावडे, महामंत्री सुभाष कासंगोट्टूवार, रवींद्र गुरनुले, कोषाध्यक्ष प्रकाश धारणे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष अंजली घोटेकर, आत्मनिर्भर आघाडी जिल्हाध्यक्ष किरण बुटले, जिल्हा संयोजक (ग्रा) संजय गजपुरे, महामंत्री(ग्रा) नामदेव डाहूले, देवानंद वाढई, तुषार सोम, रामपाल सिंह, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे, उत्तर भारतीय मोर्चाचे रुद्रनारायण तिवारी, जि. प. सभापती रोशनी खान, खुशाल बोंडे, काशिनाथ सिंह, चंदू मारगोनवार, बबन निकोडे, चेतनसिंह गौर, गणपत चौधरी, पं. स. सभापती केमा रायपुरे, अरूणा जांभुळकर, मनपाचे नगरसेवक रवी आसवाणी, राहुल घोटेकर, नगरसेविका सौ. सविताताई कांबळे, सौ. शितलताई गुरनूले, सौ. पुष्पाताई उराडे, सौ. कोमलताई फरकाडे, प्रशांत येल्लेवार, महादेव कोकोडे, होमप्रकाश नन्नावरे, साईनाथ मास्टे, गणेश उन्हाळे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन सुभाष कासंगोट्टूवार यांनी केले तर किरण बुटले यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी श्रीकांत देशमुख अन्नपूर्णा बावनकर सुलेमान बेग, रणजीत डवरे ,अभय रॉय, अनुपम भगत ,राहुल स्वामी,वैशाली पवार, मनोज पवार, हेमंत गुहे एडवोकेट सारिका, रितेश वर्मा ,अमोल उत्तरवार आदींनी परिश्रम घेतले.प्रारंभी भारतमातेचे पूजन करण्यात आले.तर राष्ट्रगीताने सांगता करण्यात आली.यावेळी महानगर जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे यांचा व्हिडीओ संदेश प्रसारित करण्यात आला.
आमचे प्रयत्न भारताच्या प्रगतीसाठी आहे....नरेंद्र मोदी
यावेळी बोलतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, जनता जनार्धनची सेवा करण्यात आम्ही कुठलीही कसर सोडली नाही.आम्ही सेवाभाव ठेवूनच कार्य करतोय.या अर्थसंकल्पाचा लाभ समाजातील प्रत्येक घटकाला होणार आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर जगात परिवर्तन झाले. तशीच स्थिती कोरोना या वैश्विक महामारीनंतर आहे.जगाच्या भारताकडून अपेक्षा आहेत. मजबूत भारत उभा करण्यासाठी भारत आत्मनिर्भर झाला पाहिजे. राजकीय विषय सोडला तर, हा अर्थसंकल्प आधुनिकतेकडे नेणारा आहे. 2014 पूर्वीच्या सरकारच्या चुकीच्या नितीमध्ये सुधारणा केल्याने देशाचा जिडीपी 1 लाख 10 हजार कोटी वरून 2 लाख 30 हजारांवर नेता आला. विदेशी मुद्रा भांडार 275 बिलियन डॉलर वरून 630 बिलियन डॉलर झाला असे ते म्हणाले.
आगामी वर्षात मूलभूत सुविधा वृद्धी, गरिबांना 80 लाख घरं, नदीजोड प्रकल्प, सीमावर्ती गावात एनसीसी व सर्व सोयी उपलब्ध करणे, प्रत्येक घरी पिण्याचे पाणी, केमिकलमुक्त व तंत्रज्ञानयुक्त शेती, खाद्य तेलात आत्मनिर्भरता, युवकांना रोजगार, डिजिटल विद्यापीठ अश्या शेकडो योजनांवर त्यांनी विस्तृत प्रकाश टाकला. भाजपा कार्यकर्त्यानी हा आत्मनिर्भर अर्थसंकल्प लोकांना समजवून सांगावा, असे आवाहन त्यांनी केले.
सरकारचे प्रवक्ते बना...भोंगळे.
आत्मनिर्भर अर्थव्यवस्था उभारण्यासाठी केंद्र शासनाने पुढाकार घेतला आहे.हा अर्थसंकल्प समजून विरोधकांच्या टिकेला, सडकून उत्तर दिले पाहिजे. महामारीच्या संकटात सरकारने 11 महिने मोफत धान्य दिले, कोविड असतांना जिडीपी वाढला, सेंद्रिय शेती, ड्रोन तंत्रज्ञान, सोलर पंप आदी विषयांचा सखोल अभ्यास करा व सरकारचे प्रवक्ते बना असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी केले.
विचारांची शिदोरी जपून ठेवा...राजेंद्र गांधी
पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या विचारावर चालणारा हा पक्ष आहे. एकात्म मानववाद म्हणजे शेवटच्या माणसाची सेवा आहे. तेच या आत्मनिर्भर अर्थसंकल्पातून स्पष्ट होते. विचारांची ही शिदोरी जपून ठेवा.आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका असे आवाहन कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेंद्र गांधी यांनी केले.