- आर्णी अवैध पार्किंगवर पोलिसांची कारवाई, तर नगर परिषदचे अजूनही डोळेझाकच
- लेकीचा गुणगौरव सोहळा,पाकधने परिवाराने केला लाडुतुला
- उशिरा का होईना महाराष्ट्राला नवं मंत्रिमंडळ मिळालं. आता त्यांनी राज्याचे प्रश्न सोडवावेत
- बिरसा मुंडा यांचे कार्य अविस्मरणीय-विष्णू अगुलदरे सर
- चंद्रपूरचा वाघ विकासासाठी पुन्हा सज्ज - माजी महापौर राखी कंचर्लावार चंद्रपूरात भाजपा कार्यकर्त्यांनी केला जल्लोष साजरा.
- आर्णी शहरातील अवैध पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष.
- सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली कॅबिनेट मंत्री पदाची शपथ
- वडगाव परिसरातील मटका अड्ड्यावर धाड, 8 जणांना अटक
- यवतमाळ नपच्या दोन सफाई कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल
- नागरिकांच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घ्या- बाळासाहेब मांगुळकर

शहरातील सायकल ट्रॅकच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशीच्या मागणीसाठी भाई अमन यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन
कारवाई न केल्यास उग्र आंदोलन करण्याचा ईशारा

शहरातील सायकल ट्रॅकच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशीच्या मागणीसाठी भाई अमन यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन
कारवाई न केल्यास उग्र आंदोलन करण्याचा ईशारा
यवतमाळ प्रतिनिधी दि ४ जुलै -: शहरातील संविधान चौक ते इतवारा चौक पर्यंत सायकल ट्रॅकची निर्मिती करण्यात आली असून शहरातील प्रदूषण कमी होऊन सायकल चालविणाऱ्यांचे प्रमाण वाढावे या उद्देशाने सायकल ट्रॅक बनविण्यात आला आहे.
मात्र या सायकल ट्रॅकची निर्मिती करण्यासाठी नगर परिषदेच्या वतीने स्थायी समितीमध्ये या सायकल ट्रॅक साठी ठराव मंजूर केला की नाही याबद्दल शंका निर्माण होत आहे.
मात्र या सायकल ट्रॅकवर जवळपास 22 लाख खर्च झाल्याचे बोलल्या जात असून अवघ्या तीन महिन्यातच या 22 लाख रुपयांचा चुराडा झाला.कारण त्या सायकल ट्रॅक वर लावलेले प्लास्टिक पोल मोठ्या प्रमाणात तोडण्यात आले असून या सायकल ट्रॅकची निर्मितीचे कंत्राट कोण्या कंत्राटदाराला दिले.देखभाल दुरुस्ती करण्याची जबाबदारी कोणाची किंवा नगरपालिकेने प्लास्टिक पोल तोडणाऱ्यावर कारवाई केली का याबद्दल शंका निर्माण होत आहे.या संपूर्ण सायकल ट्रॅक निर्मितीच्या प्रक्रियेची चौकशी करून संबंधितावर गुन्हे दाखल करावे अशी मागणी भाई अमन वेलफेअर असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले कारवाई न केल्यास सात दिवसाच्या आत संबंधितांवर कारवाई न केल्यास उग्र आंदोलन करणार असल्याचा ईशारा भाई अमन यांनी यावेळी दिला.निवेदन देतांना भाई अमन,सुकांत वंजारी,मोनु डाॅन,नाजिम शेख,अजय ठाकुर आदी उपस्थित होते.