राज्यात गचाळ राजकारन.:- डॉ. माकणीकर (समर्थनात उतरणाऱ्या आंबेडकरी गटांचा जाहीर निषेध.)
Bad politics in the state .: - Dr. Makanikar (Public protest of supporting Ambedkarite groups.)
X
*मुंबई राज्यात सध्या गचाळ राजकारण चालू असून समर्थनात उतरणाऱ्या आंबेडकरी गटांचा रिपाई डेमोक्रॅटिक पक्ष जाहीर निषेध करत असल्याची प्रतिक्रिया पक्षाचे राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर यांनी नुकतीच दिली.*
राज्य कोरोना महामारीमुळे आधीच डबगाईला आले आहे असंख्य विकासकामे व मूलभूत गरजांपासून महाराष्ट्र कोसो दूर गेलेला आहे, शिक्षणाचा दर्जा घसरला आहे, बेरोजगारीचा चा प्रश्न फासावर लटकला आहे, मानवता देशोधडीला लागली आहे, संविधानाची पायमल्ली केली जात आहे, शेतकऱ्यांचे बेहाल झाले आहेत, महिला भयभीत तर दलित अल्पसंख्यांक पीडित होत आहेत.
यांसारख्या व अन्य प्रश्नावर सत्ताधारी व विरोधक न बोलता सामाजिक जाणिव न ठेवता, सुडभावने पोटी गचाळ राजकारण केले जात हा प्रकार फार निंदनीय व निषेधार्ह आहे.
आंबेडकरी समाजातील व्यक्तींवर जेंव्हा अन्याय अत्याचार व्हायचे त्यावेळी स्वतःला पुरोगामी, गांधीवादी व राष्ट्रवादी म्हणवणाऱ्या पक्षाच्या सत्ता होत्या. काय केलं या सत्ताधाऱ्यांनी (?) कोणती कारवाई केली, उलट आंबेडकरी आंदोलकांवर खोट्या केसेस करून प्रकरण दाबण्याचाच प्रयत्न केला. आता सध्याच्या गचाळ राजकारणात आंदोलने केली जातील, जात आहेत अश्यावेळी एकाही आंबेडकरि गटाने समर्थनात उतरू नये. असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्रीय महासचिव पँथर डॉ.राजन माकणीकर यांनी दिला सोबतच जे आंबेडकरी पक्ष समर्थनात उतरतील त्यांचा जाहिर निषेध करण्यात येईल अशा सूचना सुद्धा यावेळी त्यांनी दिल्या.