घुग्घुस येथे श्री. शिवमार्कंडेय महामुनी मूर्ती प्राणप्रतिष्ठान कार्यक्रम संपन्न
At Ghughhus, Shri. Shivmarkandeya Mahamuni Murti Pran Pratishthan program concluded
X
घुग्घुस येथील घुग्घुस-वणी मार्गांवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम जवळ पद्मशाली सामाजिक बहूउद्देशीय संस्था घुग्घुसच्या वतीने श्री महर्षी मार्कंडेय जयंती निमित्त श्री शिवमार्कंडेय महामुनी मूर्ती प्राणप्रतिष्ठाना करण्यात आली.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मंचावर भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, वणी येथील पद्मशाली समाजाचे दानशूर समाजसेवी अध्यक्ष रमेश सुंकुरवार, उपाध्यक्ष भारत कुरेवार, सरपंच संतोष नुने माजी जिप सदस्य चिन्नाजी नलभोगा भाजपाचे अमोल थेरे, सिनू इसारप, पूजा दुर्गम, अनिल मंत्रिवार, काँग्रेसचे नेते शेखर तंगलपेल्ली राष्ट्रवादीचे युवाध्यक्ष दिलीप पिट्टलवार उपस्थित होते.
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी मोलाचे मार्गदर्शन केले. मंदिराला मूर्ती दान करणारे रमेश सुंकुरवार यांचे पुष्पगुच्छ देऊन भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी स्वागत केले.
यावेळी पूजनाचा व महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी पद्मशाली समाजाचे अध्यक्ष सिनू गुडला, उपाध्यक्ष शंकर कटकूरवार, सचिव राहुल पप्पूलवार, कोषाध्यक्ष श्रीरामलू मामीडाला व समाज बांधवानी प्रयत्न केले.
कार्यक्रमाचे संचालन शंकर नागपुरे यांनी केले.
यावेळी मोठ्या संख्येत समाज बांधव उपस्थित होते.