आधी पार्किंगची व्यवस्था करून द्या नंतर दंड आकारा _जिल्हाध्यक्ष श्री. सुरज ठाकरे यांची वाहतूक नियंत्रण शाखेला मागणी_
Arrange parking first then charge a fine District President Shri. Suraj Thackeray's demand to traffic control branch_
X
सविस्तर वृत्त असे की:- चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा शहरामध्ये बहुतांश भागांमध्ये अरुंद रस्त्याची समस्या तर आहेच, व याच बरोबर पार्किंगची व्यवस्था नसल्याने नागरिक नाइलाजास्तव गाड्या रस्त्यावर उभ्या करीत असतात ज्यामुळे होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे अपघात हे दिवसेंदिवस वाढतचं आहे. तथा रस्त्यावरील पांढऱ्या रंगाचे सीमारेखा पट्टे मिटून गेल्याने लोक रस्त्यावर गाड्या उभ्या करीत असतात. महत्वाचे म्हणजेचं एकीकडे पार्किंगची व्यवस्था नाही व दुसरीकडे वाहतूक नियंत्रण शाखेचे अधिकारी तथा कर्मचारी हे नो पार्किंगमध्ये गाडी असल्याचे सांगून गोरगरीब नागरिकांकडून चालान च्या नावाने पैसे वसूल करीत असतात. युवा स्वाभिमान पक्ष हे चुकीच्या गोष्टींचे समर्थन करीत नाहीचं परंतु *शासनाने सर्वप्रथम नागरिकांना पार्किंगची व्यवस्था उपलब्ध करून द्यावी त्यानंतर जर नागरिक शासनाने उपलब्ध करून दिलेल्या पार्किंग चे नियम मोडल्यास निश्चितच त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी.* तथा रस्त्याचे रुंदीकरण, पार्किंगची व्यवस्था व राजुरा शहरातील मुख्य मार्गावरील बुजलेले सीमारेखा पट्टे हे सर्वप्रथम व्यवस्थित करण्यात यावे अशी मागणी युवा स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री. सुरज ठाकरे यांनी वाहतूक नियंत्रण शाखा, राजुरा येथे आज दिनांक:- ११/०२/२०२२ ला निवेदन देऊन केली. सदर निवेदन जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वात देत असताना राजुरा शहर अध्यक्ष आशिष यमनुरवार, जिल्हा सोशल मीडिया प्रमुख राहुल भाऊ चौहान,राजुरा युवा आघाडी शहर अध्यक्ष आल्विन सावरकर, राजुरा युवा आघाडी सचिव वतन बक्सरीया, गडचांदुर युवा आघाडी शहर अध्यक्ष भूषण शेंडे,हिमांशू नक्कोलवार, अविनाश फड, सोहेल शेख व राज टाक आदी उपस्थित होते...