Home > Latest news > पोंभुर्णा तालुक्यात राशन दुकानदाराकडून मनमर्जी कारभार अनेक गावात तिव्र संताप, तहसीलदारांकडे तक्रारी

पोंभुर्णा तालुक्यात राशन दुकानदाराकडून मनमर्जी कारभार अनेक गावात तिव्र संताप, तहसीलदारांकडे तक्रारी

Arbitrary management by ration shopkeeper in Pombhurna taluka Intense anger in many villages, complaints to Tehsildars

पोंभुर्णा तालुक्यात राशन दुकानदाराकडून मनमर्जी कारभार    अनेक गावात तिव्र संताप, तहसीलदारांकडे तक्रारी
X


पोंभुर्णा तालुक्यातील चेकठाणेवासना, चेकफुटाणा, वेळवा गावातील राशन दुकानदारांच्या मनमानी कारभारा मुळे येथील नागरिकांत तिव्र संताप आहे. चेकठाणेवासना गावातील शेकडो नागरिकांनी तहसील कार्यालयात धडक देत राशन दुकानदाराचा परवाना रद्द करण्यात यावा अशी मागणी केली. व तक्रारीच्या अनुषंगाने तक्रारीचे निवारण विहित मुदतीत न झाल्यास संपूर्ण गावकरी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. त्यानंतर चेकफुटाणा येथील सरपंच व सदस्यांनी राशन दुकानदारा विरोधात ग्रामपंचायत ठराव सुद्धा तहसीलदार यांना दिला आहे. लगेच वेळवा येथील गावकरी यांनी सुद्धा संताप व्यक्त करीत राशन दुकानदारा विरोधात तहसीलदार यांना निवेदन दिले. मात्र येथील तहसीलदार नागरिकांच्या तक्रारिंना केराची टोपली दाखवतात की उचित कारवाई करतात याकडे तक्रार कर्त्यां गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

*राशन दुकानदारा विरोधात गावकऱ्यांचा आरोप*

राशन दुकानदार हा नियमित धान्य वाटप करीत नाही, दोन-दोन महिण्यांचे राशन देत नाही, आलेला धान्यसाठा फलकावर व नोंदवहीत दाखवत नाही, धान्याचे रेटबोर्ड जाहीर करीत नाही, राशन दुकान नियमित चालू ठेवत नाही, राशन दुकान परवाना दुकानात ठेवला जात नाही, धान्याचे नमुने ठेवल्या जात नाही, विक्री रजिस्टर न ठेवणे, कार्ड धारकांना शिधापत्रिकेवर दर्शविलेला माल मिळत नाही , पुस्तकी शिल्लक व प्रत्यक्ष साठा यात तफावत आहे, वेगवेगळ्या प्रकारचे हिशोब वही न ठेवणे, महाराष्ट्र फुडग्रेन रेशनिंग (सेकंड) ॲाड्र १९६६ व महाराष्ट्र अनुसूचित वस्तू (वितरण विनिमय) आदेश १९७५ अन्वये विहित केलेली वेगवेगळी रजिस्टर ठेवत नाही, अधिकृत वजन मापे न करणे अशा अनेक बाबींवर नागरिकांनी आरोप केला आहे.

*तालुका व गाव दक्षता समित्या अस्तित्वात नाही*

गोरगरीब जनतेला त्याच्या हक्काचे राशन मिळावे म्हणून राशन दुकानदारावर देखरेख राहावी म्हणून तालुका व गाव दक्षता समिती कार्यान्वित असते. या समितिच्या माध्यमातून शिधापत्रिका व एकांकाची संख्या आणि जीवनावश्यक वस्तू परिमाण या आधारे वस्तूंची गरज व प्रत्यक्ष उचल याचा तपशील तपासून आढावा घेणे, राशन दुकानात झालेली वस्तूंची आवक दक्षता समितीच्या किमान दोन सदस्यांनी प्रमाणित करणे, वस्तूंचा पुरवठा आवश्यक नियतन व प्रत्यक्ष झालेली आवक आणि उचल व साठ्याच्या त्रुटीचा आढावा घेणे, शिधापत्रिका धारकांना पुरविल्या जाणाऱ्या जीवनावश्यक वस्तूची प्रत तपासणे, राशन दुकानदार यांच्या गैरव्यवहार विरुद्ध सुसुत्रता आणणेबाबत दुकान तपासणी करणे आदी कार्ये दक्षता समिती मार्फत केल्या जातात परंतु दक्षता समित्याच अस्तित्वात नसल्याने राशन दुकानदाराचे फावत आहे.

त्यामुळे या राशन च्या मनमर्जी कारभारची वरिष्ठांनी चौकशी करून तात्काळ दुकानदाच्या मनमर्जी कारभार ला ब्रेक लावावा अशी अपेक्षा तालुक्यातील तक्रारकर्त्या कार्ड धारकांनी केली आहे.

*वरील बातमी आपल्या लोकप्रिय वृत्तपत्रात वा मिडियात प्रकाशित करावी*🙏🙏🙏🙏🙏

Updated : 21 Sep 2022 11:58 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top