महाराष्ट्र विषयी अपमान जनक वक्तव्य केल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात माफी मांगो आंदोलन
Apologize to Prime Minister Narendra Modi for making insulting remarks about Maharashtra
X
यवतमाळ दि.९ -: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राविषयी तसंच काँग्रेसविषयी केलेल्या वक्तव्याचे तीव्र पडसाद आता राज्याच्या राजकारणात उमटू लागले आहेत. महाराष्ट्रातून अनेक मजुरांना त्यांच्या राज्यात परत पाठवल्याने कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर प्रसार झाला, अशा आशयाचं विधान पंतप्रधान मोदी यांनी केलं होतं. याविरोधात आता महाराष्ट्र काँग्रेस आक्रमक झाली असून आज आंदोलन करण्यात येत आहे.
यवतमाळ शहरातील संविधान चौकामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर आज काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
चंदू चौधरी,अजय किन्हीकर,अरुण ठाकूर,विकी राऊत, कौस्तुभ शिर्के, राजिक पटेल,मोहसीन खान,राजू बोडके, अनिल चवरे,उषा दिवटे, पल्लवी रामटेके,मीनाक्षी सावरकर, अलका शेळके,प्रियंका बिडकर, संगीता उमरे,जिल्हा अध्यक्ष कौस्तुभ शिर्के,आशिष महल्ले, सुवेद भेले, निशांत मानकर,संकेत साठे आदी उपस्थित होते.
आज काँग्रेसच्या आंदोलनात अनेक उणिवा पाहायला मिळाल्या यामध्ये प्रामुख्याने काँग्रेस कार्यकर्त्यांच्या जवळ साधे मोदी विरोधी बॅनर सुद्धा नव्हते तसेच जिल्ह्याच्या ठिकाणी होत असलेल्या या आंदोलनामध्ये मोजकेच पदाधिकारी उपस्थित असल्याने एक प्रकार हे आंदोलन फोल ठरले असेही बोलले जात आहे. तसेच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आव्हान केल्याप्रमाणे पदाधिकाऱ्यांनी आंदोलन फारसे महत्त्वाचे समजले नाही नाना पटोले म्हणाले की जोपर्यंत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्राची माफी मागणार नाही. तोपर्यंत आंदोलन चालूच राहील असे म्हटल्यानंतर ही यवतमाळातील मोजकेच कार्यकर्त्यांनी दहा मिनिटं नारेबाजी करून घरची वाट धरली. यावेळी जिल्हाध्यक्षांचा पदाधिकाऱ्यांवर कुणाचाही वचक राहिलेला नाही असे या आंदोलनावरून दिसले.विशेष प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेस पदाधिकाऱ्यांना आदेश दिला होता कि भाजपाच्या कार्यालयासमोर निदर्शने करावी मात्र यवतमाळातील पदाधिकाऱ्यांनी बसस्थानक चौकात आंदोलन केल्याने आंदोलनाला महत्त्व उरले नाही असेही बोलले जात आहे.