Home > Latest news > केपीसीएल खुल्या कोळसा खाणीकरिता चिचोर्डीच्या शेतजमिनी त्वरीत खरेदी कराव्या अन्यथा आंदोलन भाकपाचे कॉ. राजू गैनवार यांचा इशारा

केपीसीएल खुल्या कोळसा खाणीकरिता चिचोर्डीच्या शेतजमिनी त्वरीत खरेदी कराव्या अन्यथा आंदोलन भाकपाचे कॉ. राजू गैनवार यांचा इशारा

Accelerate purchase of farm lands of Chichordi for KPCL open coal mines otherwise agitation CPI co. Raju Ganwar's warning

भद्रावती :- कर्नाटका पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड बंगलोच्या एकात्मिक बरांज खुल्या कोळसा खाणीच्या किलोणी कोल ब्लॉकमध्ये येणाऱ्या चिचोर्डी या भद्रावती नगर परिषद क्षेत्रातील शेतजमिनी कंपणीद्वारा त्वरित खरेदी अथवा संपादित कराव्यात याकरिता भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सहसचिव कॉ.राजू गैनवार यांनी भाकपाचे राज्यसभा खासदार विनय विश्वम यांना निवेदन पाठविले आहे.

खासदार विनय विश्वम यांनी यासंदर्भात राज्यसभेत हा प्रश्न उपस्थित करावा या हेतूने त्यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपूर्ण साधून हे निवेदन त्यांना पाठविले आहे.असे कॉ.गैनवार यांनी सांगितले. गेल्या १४ वर्षांपासून या शेतजमिनीच्या संपादनासाठी शेतजमीन मालक,स्थानिक लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासन, कंपनी प्रशासन यांना वेळोवेळी निवेदन देऊन आणि प्रत्यक्ष बोलून जमीन अधिग्रहनासाठी विनंत्या केल्या.अखेर नाईलाजास्तव शेतजमीन मालकांनी राष्ट्रपतींकडे इच्छा मरणाची मागणी केली आहे. या शेतजमिन मालकांना त्वरित न्याय द्यावा आणि इच्छा मरणापासून परावृत्त करावे अशी मागणी त्यांनी केली आहे.अन्यथा प्रकल्पग्रस्तांच्या जीवितास काही झाल्यास पक्षातर्फे आंदोलन उभारण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला आहे. कर्नाटक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड बंगलोर प्रणित इंटिग्रेटेड बरांज ओपन कास्ट माईन ही एकूण ६ ब्लॉकमध्ये विस्तारित असून सध्या किलोनी ब्लॉकचे उत्खनन सुरू असून निघणाऱ्या कोळशाचे वाहन व विक्री सुरू आहे. त्यामाध्यमातून कंपनी अब्जावधी कमावित आहे.किलोनी ब्लॉक हा बरांज आणि चिचोर्डी या दोन भागात विस्तारीत आहे. बरांज हे गाव ग्रामीण भागात येत असल्याने या शेतजमिनी कमी भावात खरेदी करुन खान सुरू केली.चिंचोर्डी हे गाव नगर पालिका क्षेत्रात येते.चिंचोर्डी या भागातील जमिनीचे शासकीय दर जास्त असल्याने कंपनी या जमीनी घेण्यास टाळाटाळ करीत आहे.या शेतजमिनी खाणीला लागून असल्याने तेथे शेती करणे शक्य नाही. त्यामुळे त्या शेतजमिनधारक व कुटुंबियांवर उपासमारीची पाळी आली आहे.

१४ वर्षाच्या प्रतिक्षेनंतरही शासन व कंपनीकडून न्याय मिळत नसल्याने जमीनधारक त्रस्त झाले आहे. केंद्रशासन,राज्यशासन,पालकमंत्री तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी ही समस्या तिवारी निकाली काढावी.अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यात येईल. असा इशारा कॉ.राजू गैनवार यांनी दिला.

या संदर्भातले निवेदन राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय कोळसा मंत्री,केंद्रीय गृहमंत्री, भाकपाचे राष्ट्रीय सचिव कॉ.डी. राजा ,केपीसीएल बंगलोरचे मॅनेजिंग डायरेक्टर,इंटिग्रेटेड बरांज ओपन कास्ट माईन बंगलोर, राज्यपाल, मुख्यमंत्री, गृहमंत्री, खनिकर्म मंत्री, पालकमंत्री विजय वडेट्टीवार, खा.बाळू धानोरकर, आ.प्रतिभाताई धानोरकर, जिल्हाधिकारी तसेच संबंधितांना देण्यात आले आहे.

Updated : 18 Feb 2022 11:25 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top