Home > Latest news > ‘कोम्बिंग ऑपरेशन’ विशेष मोहीम दरम्यान ५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पाहिजे/फरार असलेल्या ८ आरोपींसह एकूण १६ आरोपींना अटक

‘कोम्बिंग ऑपरेशन’ विशेष मोहीम दरम्यान ५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पाहिजे/फरार असलेल्या ८ आरोपींसह एकूण १६ आरोपींना अटक

A total of 16 accused including 8 wanted/absconding for more than 5 years were arrested during special operation 'Combing Operation'

‘कोम्बिंग ऑपरेशन’ विशेष मोहीम दरम्यान ५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पाहिजे/फरार असलेल्या ८ आरोपींसह एकूण १६ आरोपींना अटक
X

(फुलचंद भगत)

वाशिम:-समाजात शांतता व सुव्यवस्था नांदावी व कायद्याचे राज्य अबाधित राहावे यासाठी वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे दक्ष राहून सातत्याने कायदेशीर कारवाया केल्या जातात. त्यासाठी वेळोवेळी ‘कोम्बिंग ऑपरेशन’ सारख्या विशेष मोहिमा राबवून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारला जातो. त्यामुळे कायद्याचा वचक निर्माण होऊन समाजात शांतता प्रस्थापित होते.


याच पार्श्वभूमीवर मा.पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह (भा.पो.से.) यांच्या आदेशाने व मार्गदर्शनाखाली विशेष कोम्बिंग ऑपरेशन राबवून जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनअंतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्यांतील ५ वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून पाहिजे/फरार असलेल्या ८ आरोपींसह एकूण १६ आरोपींना अटक करण्यात पोलीसांना यश प्राप्त झाले आहे. त्यामध्ये ०२ वर्षांपासून फरार/पाहिजे असलेले आरोपी संख्या ०८, ०५ वर्षांपासून फरार/पाहिजे असलेले आरोपी संख्या ०४, ०६ वर्षे, १० वर्षे, १२ वर्षे व १६ वर्षांपासून पाहिजे/फरार असलेल्या आरोपींची संख्या प्रत्येकी ०१ याप्रमाणे एकूण १६ आरोपींना राबविण्यात आलेल्या विशेष कोम्बिंग ऑपरेशन मोहिमेअंतर्गत अटक करण्यात आले आहे. जिल्ह्यातील वाशिम, मंगरूळपीर व कारंजा उपविभागातील प्रत्येक पोलीस स्टेशनअंतर्गत कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात येत असून त्यादरम्यान पाहिजे आरोपी, निगराणी बदमाश, सराईत गुन्हेगार, शस्त्र अधिनियम कारवाया तसेच अवैध धंद्यांविरोधात कडक कायदेशीर कारवाई केली जात आहे. दि.१३.०३.२०२३ पासून सुरु असलेली हा विशेष कोम्बिंग ऑपरेशन मोहीम दि.२१.०३.२०२३ पर्यंत सुरु राहणार असून यापुढेही गुन्हे नियंत्रण व प्रतिबंधक कारवाईकरिता येणारे सण-उत्सव लक्षात घेता भविष्यातही अशा प्रकारच्या मोहिमा राबविल्या जाणार आहे.


सदर कोम्बिंग ऑपरेशनमध्ये मा.पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह (भा.पो.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पो.नि.सोमनाथ जाधव, स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम व पथक तसेच सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी व पोलीस अंमलदार यांचा समावेश आहे.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम

मो.8459273206

Updated : 18 March 2023 10:27 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top