Home > Latest news > नेत्ररुग्णांची तुकडी सेवाग्राम येथे रवाना अनेक वर्षांपासून रुग्णसेवेचे कार्य अविरत सुरु - देवराव भोंगळे

नेत्ररुग्णांची तुकडी सेवाग्राम येथे रवाना अनेक वर्षांपासून रुग्णसेवेचे कार्य अविरत सुरु - देवराव भोंगळे

A team of eye patients left for Sevagram The work of patient service has been going on uninterruptedly for many years - Devrao Bhongale

नेत्ररुग्णांची तुकडी सेवाग्राम येथे रवाना    अनेक वर्षांपासून रुग्णसेवेचे कार्य अविरत सुरु - देवराव भोंगळे
X





मा. आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार आरोग्य सेवा समिती महाराष्ट्र घुग्घुसतर्फे भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात व भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांच्या मार्गदर्शनात घुग्घुस परिसरातील जेष्ठ नागरिकांची तुकडी सेवाग्राम येथील कस्तुरबा गांधी रुग्णालयात मोतीबिंदूच्या उच्चस्तरीय तपासणी करिता पाठविण्यात आली आहे.

अनेक वर्षापासुन उच्चस्तरीय तपासणी करिता जेष्ठ नागरिकांची तुकडी सेवाग्राम येथील रुग्णालयात पाठविण्यात येत आहे.

याप्रसंगी बोलतांना भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे म्हणाले की मागील अनेक वर्षांपासून मा. आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राच्या माध्यमातून घुग्घुस परिसरातील गोर गरीब गरजू व जेष्ठ नागरिकांना आरोग्याच्या विविध सेवा मोफत उपलब्ध करून देत आहोत, रुग्णसेवेचे कार्य अविरत पणे सुरु आहे. गरजू रुग्णाला आरोग्य विषयक मदत लागल्यास घुग्घुस येथील मा. आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राशी संपर्क साधावा.

यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, भाजपाचे प्रवीण सोदारी, भारत साळवे, हेमंत पाझारे, शरद गेडाम, अनिल नीत, गणेश खुटेमाटे, पांडुरंग थेरे, रुपेश कोहळे, तुलसीदास ढवस, सुशील डांगे व जेष्ठ नागरिक उपस्थित होते.

Updated : 18 Feb 2022 11:18 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top