म मराठी न्यूज नेटवर्क कडून लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली
A heartfelt tribute to Lata Mangeshkar from M Marathi News Network
X
म मराठी न्यूज नेटवर्क कडून लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली
जाकीर हुसेन - 9421302699
😓 देश शोकसागरात बुडाला
▪️ लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर
▪️ शासकीय इतमामात सायंकाळी मुंबईतील शिवाजी पार्कवर अंत्यसंस्कार
▪️ राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांसह विविध क्षेत्रातील दिग्गजांकडून श्रद्धांजली..
अशी होती कारकीर्द :
म मराठी❗स्पेशल
...लता दीदींविषयी 'या' गोष्टी कदाचित तुम्हाला माहितही नसतील
लता मंगेशकर यांचा जन्म 28 सप्टेंबरला मध्यप्रदेशातील इंदोर मध्ये झाला आहे. अनेक दशकं त्यांनी गाण्यातून लोकांचं मनोरंजन केलं आहे. आज आम्ही तुम्हाला त्यांच्या जीवन प्रवासातील काही विशेष गोष्टींबाबत माहिती देणार आहोत.
दीदींविषयी 'या' गोष्टी नक्की वाचा...
लतादीदी त्यांच्या बालपणी फक्त एकच दिवस शाळेत गेल्या होत्या
वयाच्या 13 व्या वर्षी त्यांनी पहिलं गाण रेकॉर्ड केलं होतं. तो दिवस 16 डिसेंबर 1941 होता.
लता दीदींनी त्यांच्या करिअरमधलं पहिलं गाण किती हसाल चित्रपटासाठी गायलं होतं
पहिल्यांदा रंगमंचावर गाणे सादर केले तेव्हा त्यांना 25 रुपये मिळाले होते
लता दीदींचे एकदा गाणे रेकॉर्ड झालं की त्या ते कधी ऐकायच्या नाहीत
'ऐ मेरे वतन के लोगों' त्यांनी गायले, हे गीत ऐकून पंतप्रधान पंडित नेहरूंच्या डोळ्यांत अश्रू आले होते.
दीदींच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये त्यांनी 30000 गाणी गायली आहेत
लता मंगेशकर एक अशा गायिका ज्यांनी त्यांच्या करिअरमध्ये अधिक पुरस्कार मिळविले आहेत.
रंग दे बसंती सिनेमातील लुका चुप्पी गाण्याच्या रेकॉर्डींगसाठी तब्बल 8 तास उभ्या राहिल्या होत्या.
28 सप्टेंबर 1929 ला एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म.
वयाच्या पाचव्या वर्षी वडिलांच्या संगीत नाटकांमध्ये बाल-कलाकार म्हणून कामाला सुरुवात.
लता दीदी अवघ्या 13 वर्षांच्या असताना त्यांच्या वडिलांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन.
त्यांनी हिंदी, मराठीसह अनेक भाषांमध्ये रसिकांच्या मनावर आपले नाव कोरले.
त्यांच्या नावे गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये देखील विक्रम नोंदलेले आहेत.
1974 ते 1991 च्या कालावधीत सर्वात जास्त रेकॉर्डिंग्सचा विक्रम त्यांनी केला.
लता मंगेशकरांच्या कारकिर्दीची सुरुवात 1942 मध्ये झाली.
2001 साली त्यांना 'भारतरत्न' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
लतादिदींनी आपल्या जादुई आवाजाच्या जोरावर 'गानकोकिळा' अशी बिरुदावली मिळवली.
भारत रत्नसह पद्म विभूषण, पद्म भूषण आणि दादासाहेब फाळके अवार्ड सारख्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित.