Home > Latest news > चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे प्रजासत्ताक दिनाचा ७२ वा वर्धापन दिन कार्यक्रम

चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे प्रजासत्ताक दिनाचा ७२ वा वर्धापन दिन कार्यक्रम

72nd Republic Day Program on behalf of Chandrapur Municipal Corporation

चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे प्रजासत्ताक दिनाचा ७२ वा वर्धापन दिन कार्यक्रम
X




चंद्रपूर, ता. २५ : शहर महानगरपालिकेच्या वतीने भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७२ व्या वर्धापन दिनानिमित्त बुधवार दिनांक २६ जानेवारी २०२२ रोजी सकाळी ७:५० वाजता महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयात ध्वजारोहण समारंभ आयोजित करण्यात आला आहे.

महापौर सौ. राखी संजय कंचर्लावार यांच्या हस्ते सकाळी ७.४० वाजता महानगरपालिका कार्यालयासमोरील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास माल्यार्पण होईल. त्यानंतर ७.५० वाजता महानगरपालिका कार्यालयाच्या इमारतीवर ध्वजारोहण व मानवंदना कार्यक्रम होईल. या कार्यक्रमाला उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती संदीप आवारी, आयुक्त विपीन पालीवाल यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

सकाळी ८ वाजता प्रभाग कार्यालय क्रमांक- १ संजय गांधी मार्केट सिव्हिल लाइन्स चंद्रपूर येथे सभापती, प्रभाग - १ यांच्या हस्ते ध्वजारोहण व मानवंदना कार्यक्रम होईल. प्रभाग कार्यालय क्रमांक - २ कस्तुरबा भवन सात मजली इमारत गांधी चौक येथे सभापती, प्रभाग - २ यांच्या हस्ते ध्वजारोहण व मानवंदना कार्यक्रम होईल. प्रभाग कार्यालय क्रमांक - ३ देशबंधू चित्तरंजन दास प्राथमिक शाळा, बंगाली कॅम्प चंद्रपूर येथे सभापती, प्रभाग - ३ यांच्या हस्ते ध्वजारोहण व मानवंदना कार्यक्रम होईल. सकाळी ८.१५ वाजता जटपुरा गेट समोरील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास महापौरांच्या हस्ते माल्यार्पण होणार आहे. सकाळी ८.२५ वाजता हुतात्मा स्मारक वाचनालय सिविल लाइन्स येथे प्रभाग क्रमांक १ चे सभापती यांच्या हस्ते ध्वजारोहण व मानवंदना कार्यक्रम होईल. शासन निर्देशानुसार सदर कार्यक्रम कमीतकमी उपस्थितीत होणार असून, केवळ विभागप्रमुख आणि महत्वाच्या व्यक्तींनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Updated : 25 Jan 2022 12:27 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top