Home > Latest news > वर्ल्ड व्हिजन संस्थेने खेड्यापाड्यातील विजेची समस्या योग्य प्रकारे मांडली होती

वर्ल्ड व्हिजन संस्थेने खेड्यापाड्यातील विजेची समस्या योग्य प्रकारे मांडली होती

The problem of rural electricity was rightly presented by World Vision

वर्ल्ड व्हिजन संस्थेने खेड्यापाड्यातील विजेची समस्या योग्य प्रकारे मांडली होती

भोकर.. तालुका प्रतिनिधी गजानन गाडेकर

वर्ल्ड व्हिजन संस्था समस्यांना उत्तर देण्यासाठी आणि उपाय देण्यासाठी आणि स्थानिक ग्रामपंचायतीच्या सहकार्याने नेहमीच पुढे असते. हाडोळी, हळदा आणि पोमनाळा या गावांमध्ये वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने जलप्रकल्प बंद असून जनतेला सुरक्षित व शुद्ध पिण्याचे पाणी पुरवता येत नाही. वर्ल्ड व्हिजन संस्थेने ग्रामपंचायतीला सौर पॅनेलसह सबमर्सिबल मोटर पंपाची मदत केली होती आणि आता हे जलयंत्र वीजेचा कोणताही त्रास न होता चालू शकतात. आज भोकर गट विकास अधिकारी अमित राठोड आणि वर्ल्ड व्हिजनचे व्यवस्थापक श्याम बाबू पट्टापू यांनी ग्रामपंचायतींकडे सुपूर्त केली. वर्ल्ड व्हिजन संस्थेचे व्यवस्थापक श्याम बाबू पट्टापू प्रत्येक वॉटर प्लांट साठी २.१ लक्ष रुपया ची गुंतवणूक केल्याचे सांगितले. गटविकास अधिकारी अमित राठोड यांनी या गावांना 24 तास पिण्याचे पाणी मिळण्यासाठी मदत केल्याबद्दल वर्ल्ड व्हिजन संस्थेचे कौतुक केले. भोकर सरपंच संघाचे अध्यक्ष माधवराव अमृतवाड यांनी त्यांच्या गावात पिण्याच्या पाण्याची नितांत गरज आणि दोन अंगणवाडी केंद्र रंगवल्याबद्दल वर्ल्ड व्हिजन संस्थेचे आभार मानले. या कार्यक्रमात ग्रामसेवक, सर्व ग्रामपंचायत सदस्य व तंटामुक्ती अध्यक्ष व सर्व नेत्यांनी उपस्थित राहून वर्ल्ड व्हिजनचे आभार मानले.

Updated : 2022-09-23T11:43:36+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top