मारेगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष-उपनगराध्यक्ष पदासाठी नाट्यमय घडामोडी
Dramatic developments for the post of Mayor-Deputy Mayor of Maregaon Nagar Panchayat
X
विभागीय संपादक:- निलेश अ. चौधरी
मारेगाव नगरपंचायतीमध्ये सोमवारी झालेल्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदांच्या निवडणुकीत नाट्यमय घडामोडी घडल्यानंतर अखेर शिवसेनेचे डॉ.मनिष मस्की नगराध्यक्ष तर भाजपच्या हर्षा महाकुलकर उपनगराध्यक्ष पदी विराजमान झाले असून सर्वाधिक संख्याबळ असुन सुद्धा कॉंग्रेस ला सत्तेपासून दूर रहावे लागले आहे.
भाजप- शिवसेनेचे निवडुन आलेल्या आठ उमेदवारांची मतं नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत ठाम राहिली खरी मात्र उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या ऐन वेळी शिवसेनेचे नगराध्यक्ष अनुपस्थित राहिल्याने मोठी खळबळ माजली होती. शिवसेनेचे डॉ. मनिष मस्की यांना आठ तर काँग्रेसचे नंदेश्वर आसुटकर यांना सात मते मिळाली, भाजपाच्या चार मतासह आठ मते घेऊन नगराध्यक्षपदी विराजमान झालेले शिवसेनेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष डॉक्टर मनिष मस्की हे उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणूकीत अनुपस्थित राहल्याने भाजपच्या सौ. हर्षा महाकुलकर यांना सात मते, तर मनसेच्या अंजुम शेख यांना सात मते मिळाल्याने ईश्वर चिट्ठी काढुन भाजपच्या सौ. हर्षा महाकुलकर यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी उपनगराध्यक्षपदी विजयी घोषित केले. नगरपंचायत उपाध्यक्षपदी निवडुन आलेल्या भाजपाच्या हर्षा महाकुलकर यांच्या विजयासाठी वणी विधानसभेचे आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार व भाजपचे जिल्हा महामंत्री तथा मारेगाव नगर पंचायत प्रभारी यांनी अथक परिश्रम घेतले होते मात्र ऐन वेळी शिवसेनेने 'दगा' दिल्याने अखेर ईश्वर चिठ्ठीने भाजपाच्या उपनगराध्यक्ष हर्षा महाकुलकर यांना तारल्याने शिवसेनेचा "गेम"फसल्याचे बोलले जात आहे.