Home > Latest news > विविध पिकांच्या उत्पादकता वाढीसाठी ग्रामीण भागात शेतकऱ्यांना शेती शाळा व प्रशिक्षण

विविध पिकांच्या उत्पादकता वाढीसाठी ग्रामीण भागात शेतकऱ्यांना शेती शाळा व प्रशिक्षण

Agricultural schools and training to farmers in rural areas to increase productivity of various crops

विविध पिकांच्या उत्पादकता वाढीसाठी ग्रामीण भागात शेतकऱ्यांना शेती शाळा व प्रशिक्षण
X

विविध पिकांच्या उत्पादकता वाढीसाठी ग्रामीण भागात शेतकऱ्यांना शेती शाळा व प्रशिक्षण

-------------------------------------

भोकर /गजनान गाडेकर/. राज्य पुरस्कृत एकात्मिक सोयाबीन उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकास प्रकल्प अंतर्गत सोयाबीन उत्पादकता वाढीसाठी तालुक्यातील ग्रामीण भागात नागापूर, भोसी, धारजणी, हाडोळी, महागाव, कोळगाव बु. नांदा खु. या सात गावात शेती शाळा व प्रशिक्षण घेण्यात येणार आहे तर कापूस उत्पादकता वाढीसाठी यामध्ये हाळदा, रिठ्ठा, दिवशी बु. कांडली, सावरगावं मेट या पाच गावात ही शेतीशाळा व प्रशिक्षण देण्यात येणार असून यासह तालुक्यातील इतर गावातही मार्गदर्शनपर अनेक कार्यक्रम घेण्यात येणार असल्याची माहिती भोकर तालुका कृषी अधिकारी व्ही. बी. गिते यांनी दिली आहे .याच अनुषंगाने मौजे नागापूर येथे दिनांक २१ सप्टेंबर २०२२ रोजी सोयाबीन उत्पादकता वाढीसाठी व मूल्य साखळी बाबद तर दिनांक २२ सप्टेंबर २०२२ रोजी मौजे कांडली व सावरगावं मेट येथे कापूस पिका संबंधित शेती शाळा व प्रशिक्षण घेण्यात आले

मौजे नागापूर येथे शेती शाळा व प्रशिक्षणा वेळी भोकर तालुका कृषी अधिकारी व्ही. बी. गीते,मंडळ कृषी अधिकारी सुनील सूर्यवंशी, कृषी पर्यवेक्षक संदीप नाळापुरे,कृषी सहाय्यक मनीष सुकळीकर, कृषी सहाय्यक लक्ष्मण राठोड आदींची प्रमुख उपस्थिती होती.सदरील शेती शाळा व प्रशिक्षणासाठी विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयातील अधिकारी ऑनलाईन पद्धतीने सहभाग घेऊन शेतकऱ्यांना सखोल असे मार्गदर्शन केले .

मौ कांडली येथे श्रीमती आपटे एस ए श्री आनंदा बोईनवाड तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक व शेतकरी बांधव उपस्थित होते . मौ सावरगाव मेट येथे श्री उत्तम नखाते मंडळ कृषि अधिकारी मातुळ श्री दत्ताहरी जाधव कृषि सहायक व शेतकरी बांधव उपस्थित होते .

यावेळी मौजे नागापूर, कांडली व सावरगावं मेट परिसरातील शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Updated : 22 Sep 2022 3:22 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top